आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत ध्वजवंदनापूर्वीच राष्ट्रगीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालिकेच्या आवारात बुधवारी सकाळी 10 वाजता ध्वजवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, राष्ट्रध्वज फडकविण्यापूर्वीच राष्ट्रगीत सुरू झाले व चूक लक्षात येताच पुन्हा ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटल्याने राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक तक्रार दाखल करणार असल्याची माहिती नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांनी दिली आहे. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले की, ध्वजारोहणासाठी पुढे सरसावत असताना विद्यार्थ्यांनी वाद्य वाजवताच राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, ही तांत्रिक चूक लक्षात येताच राष्ट्रगीत थांबवून ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्याधिकारी अनिल जगताप, उपनगराध्यक्षा नूरजहॉँ खान, आमदार संजय सावकारे, नगरसेवक राजेंद्र आवटे, युवराज लोणारी, युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, रघुनाथ सोनवणे, आशिक खान, प्रा.दिनेश राठी, पालिकेचे आरोग्य सभापती निर्मल कोठारी, विजय चौधरी, भागवत पाटील, नितीन धांडे, भीमराज कोळी, तुषार पाटील, जुबेर पठाण यांच्यासह नगरसेवक व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानवर आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी राहुल मुंडके, नायब तहसीलदार बी.एस.वानखेडे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, शहरचे दिलीप पगारे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील बोरसे यांच्यासह महसूल, पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पालिका संचलित म्युनिसीपल हायस्कूल - म्युनिसीपल हायस्कूलमध्ये पालिकेचे शिक्षण सभापती राजेंद्र आवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आमदार संजय सावकारे, नगरसेवक उदयसिंग काके, निर्मल कोठारी, विजय चौधरी, कैलास चौधरी, शेख मुस्ताक उपस्थित होते. मुख्याध्यापिका यू.एम. तायडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते.
एम.आय.तेली इंग्लिश स्कूल - एम.आय.तेली इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष मुन्ना तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे संचालक, पालकांचे स्वागत मुख्याध्यापक वाजीद सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन शेख इम्रान यांनी केले.
सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय - सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संचालिका बानोबी तडवी, मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर उपस्थित होते.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन - नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे मजदूर भवन येथे मंडळ निरीक्षक हीरा चौधरी यांच्या हस्ते झाले. रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट येथे अजमलखान यांच्या हस्ते तर रेल्वे कंझुमर सोसायटी येथे व्ही.बी.भोळे तर सिनीअर इन्स्टिट्यूट येथे आर.पी. भालेराव यांनी ध्वजारोहण केले.या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.
सानेगुरूजी माध्यमिक विद्यालय - के. नारखेडे कॉलेज ऑफ सायन्स, के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एन.के.नारखेडे इंग्लिश मीडिअम स्कूल येथे संस्थेचे उपाध्यक्ष र्शीनिवास एन. नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थाध्यक्ष एन.के.नारखेडे, चेअरमन पी.आर.पाटील, प्रमोद नेमाडे, संस्थेचे सदस्य आर. एल. गुळवे, पी.व्ही.पाटील. विकास पाचपांडे, मुख्याध्यापक पी.एस.लोखंडे, उपमुख्याध्यापक जी.एम.महाजन उपस्थित होते. आठवीची विद्यार्थिनी चेतना पाटील हीने भाषण दिले. एन.के. नारखेडे इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. डॉ.चारूलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका कोमल कुळकर्णी यांनी आभार मानले.
उसामा उर्दू हायस्कूल - मायनॉरेटी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित उसामा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे निवृत्त आदर्श मुख्याध्यापक मजिद खान मुस्तुफाखान यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थाध्यक्ष रऊफ खान व ताहेरखान मजिदखान, मुख्याध्यापक सय्यद नविद अख्तर राहतअली यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
क्षेत्रिय रेल्वे प्रशिक्षण संस्था - मध्य रेल्वेच्या क्षेत्रिय रेल्वे प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य एल.एम.सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मध्य रेल्वेचे महा- व्यवस्थापकांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले. संस्थेच्या प्रशिक्षणार्थी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेडमध्ये सहभाग घेतला होता. परेडचे निरीक्षकण प्राचार्य सय्यद आणि उपप्राचार्य आर.डी. कोरी यांनी केले. सहायक कार्मिक अधिकारी विनयकुमार जोशी, सुनील परदेशी, एस.ए. पाटील, बापू सरोदे यांनी सहकार्य केले.
विद्याश्रम इंग्लिश स्कूल - जय गणेश फाउंडेशन संचलित विद्यार्शम इंग्लिश मीडिअम स्कूल येथे शाळेचे संचालक प्रा. म.सी. हळपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शाळेचे चेअरमन अरूण मांडाळकर, गणेश फेगडे, वीरेंद्र पाटील, अँड. दिलीप पंडित, गोविंद हेडा आदी उपस्थित होते.