आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथळीचा नीलेश भिल राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराचा मानकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर - बुडणाऱ्या मुलास जीवदान देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कोथळी जिल्हा परिषद शाळेचा चाैथीचा विद्यार्थी नीलेश रेवाराम भिल याची राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याबाबतचे पत्र बुधवारी प्राप्त झाल्याने नीलेशच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नीलेशसह महाराष्ट्रातून चौघांना राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला असून २६ जानेवारीला नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
३० अाॅगस्ट २०१४ राेजी अाेंकार घाेगले (रा. फुली, ता.नांदुरा, िज.बुलडाणा) हे कुटुंबीयांसह काेथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी अाले हाेते. या मंदिर परिसरात विकासाची कामे सुरू अाहेत. त्यात पूर्णा नदीचे बॅक-वाॅटर मंदिराच्या समाेरच्या बाजूस साेडून भाविकांसाठी घाट तयार करण्यात अाला अाहे. घाेगले कुटुंबीय दर्शन घेण्यात व्यस्त असताना त्यांचा मुलगा भागवत घाेगले (वय ११) हा घाटावर गेला हाेता. मात्र, तो पाय घसरून पाण्यात पडला. ही घटना लक्षात येताच मंिदरात दर्शनासाठी अालेल्या नीलेश भील (वय १०) याने पाण्यात सूर मारून काही मिनिटांतच भागवतला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. नीलेशने जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या या धाडसाबद्दल उपस्थितांनी त्याचे काैतुक केले होते.
बातम्या आणखी आहेत...