आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Congress Party News In Marathi At Jalgaon

सत्तेला धुडकावत राष्ट्रवादीचा घाेडेबाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उपमहापाैरपदासहसत्तेत सहभागाची अाॅफर धुडकावत राष्ट्रवादी कंपूने राताेरात भाजपसाेबत घाेडेबाजार करत चमत्कार घडवून अाणला. या घाेडेबाजारातूनच तिजाेरीच्या चाव्या भाजपच्या हाती देणे शक्य झाले अाहे. या नाट्यमय घडामाेडीत भाजपच्या नव्या नेत्यांनी अापली काॅलर टाइट केली असली तरी या संपूर्ण घाेडेबाजारासाठी कर्ज घेऊन खर्च केलेल्या पालिका कर्मचाऱ्यावर मात्र अापली मालमत्ता विकण्याची वेळ अाली अाहे.

स्थायी सदस्य निवृत्त हाेताना ईश्वर चिठ्ठीत नशिबाने साथ दिल्याने खाविअा स्थायीत अल्पमतात अाली. सभापती िनवडीच्या वेळी िनर्णायक भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या कंपूने ही बाब साधत खाविअा नेत्यांकडे अार्थिक तडजाेडीची भाषा केली. महापाैरपदानंतर महत्त्वाचे असलेले स्थायी समिती सभापतिपद राखण्यासाठी खाविअाने उपमहापाैरपदासह चार प्रभाग समित्यांपैकी काही ठिकाणी सभापती पदे देण्याची अाॅफर राष्ट्रवादीच्या कंपूला दिशा देणाऱ्यासदिली हाेती. मात्र, उपमहापाैरपद मिळाले तरी ११ नगरसेवकांपैकी काेणाला उपमहापाैर करायचे, यावर एकमत हाेणे शक्य नव्हते. त्यामुळे पदांच्या एेवजी अर्थपूर्ण व्यवहार करण्याची अाॅफर सत्ताधाऱ्यांना देण्यात अाली.

यासाठी मागण्यात येणाऱ्या अाकड्याला खाविअाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली नाही. निर्णायक वेळ हातातून जात असल्याने कंपूचे नेतृत्व करत असलेल्या तथाकथीत पदाधिकाऱ्याने भाजपच्या नवीन नेत्यांना हेरले. खाविअा संपर्कात अाहे. मात्र, तुम्ही मागणी पूर्ण केल्यास भाजपच्या सदस्यांना पाठिंबा देण्याची तयारी असल्याची अाॅफरदिली. सभापतिपद मिळत असल्यास थाेडा खर्च करायला काय हरकत अाहे. यासाठी राताेरात घाेडेबाजाराची चक्रे फिरली. सभापती निवडीच्या काही तास अगाेदर एका ठिकाणी बैठक झाली. राष्ट्रवादीच्या कंपूला अपेक्षित घाेडेबाजारासाठी मनपा कर्मचाऱ्याला माेठी उसनवारी करावी लागली. यावर लक्ष ठेवून असलेल्या खाविअाने पराभवापेक्षा एेनवेळी माघार घेण्याची खेळी केली.
भाजपत नाराजी
घाेडेबाजारकरायचा हाेता तर अाम्हालाच सभापतिपदाची उमेदवारीदिली असती. अाम्हीही खर्च केला असता, या मुद्यावरून भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली अाहे.