आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारींचा निपटारा : राष्ट्रीय लाेकअदालतीत ३,६३७ खटले निकाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे शनिवारी घेण्यात अालेल्या राष्ट्रीय लाेकअदालतीत तीन हजार ६३७ खटले निकाली काढण्यात अाले. तसेच २० काेटी ३१ लाख १३ हजार १४० रुपयांची तडजाेड या राष्ट्रीय लाेकअदालतीत झाली.

विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्ह सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर अध्यक्षस्थानी हाेते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव अार.एम.मिश्रा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एन.अार. लाठी, अॅड.अानंद मुजूमदार अादी उपस्थित हाेते. राष्ट्रीय लाेकअदालतीत एकूण १४ पॅनल नेमण्यात अाले हाेते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश अाणि दाेन पॅनलचे सदस्य वकील, असे तिघांचे पॅनल हाेते.

फाैजदारी तसेच दिवाणी खटले, धनादेश अनादर प्रकरणे, माेटार वाहन कायद्याचे प्रकरणे त्याचप्रमाणे सेंट्रल बँक, अायडिया सेल्यूलर, भारत संचार निगम लि., बँक अाॅफ बडाेदा, युनियन बँक, युकाे बँक, कॅनरा बँक, अलाहाबाद बँक, देना बँक, स्टेट बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, जनता बँकेचे खटलापूर्व लाेकअदालतीत एकूण तीन हजार ६३७ खटले निकाली निघाले. तसेच अाैद्याेगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, सहधर्मदाय अायुक्त, ग्राहक मंच यांचे स्पेशल ड्राइव्हची प्रकरणे तडजाेडीने निकाली निघाली. सर्व प्रकरणांमध्ये २० काेटी ३१ लाख १३ हजार १४० रुपये रकमेची तडजाेड झाली.

राष्ट्रीय लाेकअदालतीत दाखल केलेल्या तक्रारींचा निपटारा करताना न्यायाधीश पक्षकार.

वृद्धांची अधिक उपस्थिती
राष्ट्रीय लाेकअदालतीसाठी शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात पक्षकारांची गर्दी झाली हाेती. त्यात विशेष म्हणजे वृद्ध अाणि महिलांची संख्या लक्षणीय हाेती. भूसंपादनाचे, काैटुंबिक कलहाचे, प्रकल्पग्रस्तांचे अनेक खटले या वेळी निकाली काढले.
बातम्या आणखी आहेत...