आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ हजार बालकांना पोलिओ डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रविवारी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २३ हजार ८९४पैकी २१ हजार २८६ बालकांना पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पोलिओ डोस पाजण्यात आला.

रविवारी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, मुख्याधिकारी भारत राठोड पालिका रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अिधकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्या उपस्थितीत पालिका दवाखान्यात पल्स पोलिओ मोिहमेचे उद‌्घाटन करण्यात आले. शहरातील २३ हजार ८९४, तर तालुक्यातील ३९ हजार ५४२ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालिका आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागांमध्ये ९० बूथ लावण्यात आले.
पोलिओ डोस पाजताना प्रांत िवजयकुमार भांगरे.

३५० कर्मचारी झाले होते सहभागी
०५ महामार्गावर नियुक्त पथके
०३ मोबाइल पथक मोिहमेसाठी
१८ पथकांची केली शहरात निर्मिती
९० पल्स पोलिओ लसीकरण बूथ

शाळांचेही लाभले सहकार्य
हीमोहीम यशस्वी करण्यासाठी पालिका आरोग्य विभाग, नगरपालिका दवाखाना कर्मचारी, माता-बाल संगोपन विभाग, मलेरिया विभाग, अंगणवाडीसेविका, दे.ना.भोळे महाविद्यालय, नाहाटा महाविद्यालय आिण कोटेचा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह डी.एस.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. याकामी नगराध्यक्ष अख्तर पिंजारींसह नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.