आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Rural Health Mission, Latest News In Divya Marathi

ईगल सिक्युरिटी कंपनीकडून दिशाभूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) ईगल सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात अकाउंटंट कम डाटा एण्ट्री ऑपरेटर या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर एसएमएस पाठवून त्यांच्याकडून नोकरीसाठी दोन हजार रुपये घेऊन अनेक उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले गेले. मात्र ईगल सिक्युरिटी कंपनीने जाहिरातीत एनआरएचएमचा लोगो वापरून उमेदवारांची दिशाभूल केल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.बी.डी.पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
आचारसंहितेत भरती कशी ?
ईगल सिक्युरिटी कंपनीने 5 मार्चला डाटा एण्ट्री ऑपरेटरच्या भरतीसंदर्भात वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. त्याचदिवशी लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिताही लागली. त्यामुळे कंपनीला निवडणूक विभागाची परवानगी घेण्याची गरज होती. ती घेतली नसेल तर भरती बेकायदेशीर असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. पवार यांनी सांगितले. या संदर्भात ईगल सिक्युरिटीचे अधिकारी संतोषसिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला असता त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारला नाही.
पैशांची पावती दिलीच नाही
411 मार्चला नियुक्ती पत्र घेण्यासाठी यावे अन् येताना दोन हजार रुपये घेऊन यावे, असा एसएमएस 10 मार्चला आला होता. दोन हजार दिल्यानंतर मी पावती मागितली मात्र त्यांनी दिली नाही. त्यामुळे मी पैसे दिले नाहीत, म्हणून मला नियुक्ती देण्यात आली नाही. विनोद बडगुजर, उमेदवार, धरणगाव.
पैसे घेणेही चुकीचे
ईगल सिक्युरिटी कंपनीला आरोग्य विभागाने डाटा एण्ट्री ऑपरेटरची भरती करण्यासंदर्भात ठेका दिला होता. मात्र त्यांनी त्यांच्या बॅनरखाली जाहिरात देणे गरजेचे होते. दोन हजार रुपये घेणेही चुकीचे आहे. या संदर्भात तक्रारी आल्या असून त्या आरोग्य संचालक आणि सिक्युरिटी कंपनीच्या नोडल ऑफिसकडे या तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत. डॉ.बी.डी. पवार, आरोग्य उपसंचालक.
आचारसंहितेत भरती कशी?
या भरती संदर्भात 5 मार्चला जाहिरात देण्यात आली आणि लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिताही त्याच दिवशी लागू झाली. आचारसंहितेत भरती कशी घेतली? हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्या शिवाय जाहितरातीत शुल्क 100 रुपये आणि प्रत्यक्ष नियुक्ती देताना दोन हजार हे कसे ? यात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. हरिहर पाटील, सरचिटणीस, भारतीय कर्मचारी महासंघ.