आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड मॅनेजमेंटतर्फे ‘टेक क्रंच-2013’ या टेक्निकल इव्हेंटला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शनिवारी स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेत राज्यासह देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. 13 वेगवेगळय़ा प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी पाण्यावर चालणारा रोबोने धूम केली.
स्पर्धेचे शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोलिस आयुक्त एस.जयकुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राजेंद्र जैन, अविनाश रायसोनी, महेंद्र रायसोनी, प्रीतम रायसोनी, प्राचार्य प्रभाकर भट, प्रीती अगरवाल उपस्थित होते. रोबो रेस ही स्पर्धा सर्वसामान्य आणि अँडव्हान्स या दोन प्रकारात घेतली जात आहे. अँक्वारोबा या प्रकारात पाण्यावरून, खालून चालणार्या रोबोंची शर्यत ही शुक्रवारी चांगलीच रंगली होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिले जाते प्राधान्य
स्पर्धेचे हे तिसरे वर्षे आहे. कॉम्प्युटर आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अग्रक्रम दिला जातो. विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार रोबो बनवतात. त्यांना महाविद्यालयाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाते.
प्रभाकर भट, प्राचार्य
वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न
यावर्षी आम्ही पाण्यावर चालणारा रोबो तयार केला आहे. विविध ट्रॅक तयार केले असून क मीत कमी वेळेत आपले उद्दिष्ट पूर्ण कसे करता येईल, यासाठी विविध तांत्रिक बाबींचा विचार करण्यात आला आहे. केवल मोमतोरा, विद्यार्थी
आज या होणार स्पर्धा
शनिवारी रोबो रेस, रोबो वॉर, रोबो ट्रॅकर, अँक्वारोबा, रोबो स्नूकर, चॉप स्ट्रर, जंक यार्ड, सी क्वीज, सी. पी.यू. अँसेम्ब्ली, सर्किट मानिया, ..लॉन.. लॅन गेमिंग, मेका ग्राफिक्स या स्पर्धा होणार आहे. यात रोबो वॉर हे वेगळेच आकर्षण असते. यात रोबो वेगवेगळे शस्त्रे वापरून युद्ध करतो. तसेच विमानांच्या एअर शोचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.
येथून आले स्पर्धक
बडोदा, सुरत, वापी, रायपूर, इंदूर, भोपाळ, विदर्भ, नंदुरबार, खंडवा, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.