आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Nationalism' Hospitality By Contaminated Water Pinarya Academic

‘राष्ट्रवादी’तर्फे दूषित पाणी पिणार्‍या प्राध्यापकाचा सत्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात दूषित पाणीपुरवठय़ाच्या तक्रारीनंतर बाटलीतील पाणी पिणार्‍या प्रा. कविमंडन यांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.
मनसेतर्फे विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले.
मनसेच्या पदाधिकार्‍यांना माघारी फिरण्याची वेळ आल्याने दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. कुणाल पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्राचार्य दे.र्शी.बोंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात आंदोलनादरम्यान दूषित पाणी पिणार्‍या प्रा. कविमंडन यांचे कौतुक केले.