आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Leader Devkar Goes With Khadse

राष्ट्रवादीत फूट: देवकर खडसेंसाेबतच राहणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्वपक्षीय पॅनलमधून राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात अाला असला तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर हे मात्र पालकमंत्री एकनाथ खडसेंच्या पॅनलमध्ये राहणार अाहेत; तर राजकीय अस्तित्वासाठी दाेन्हीकडे धडपड करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी शनिवारी दाेन्हीकडे हात ठेवून बाेलणी सुरू ठेवली. शुक्रवारी राष्ट्रवादी कार्यालयात अालेले वाल्मीक पाटील अाणि विष्णू भंगाळे यांनी शनिवारी ‘मुक्ताई’ चरणी धाव घेऊन पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी पॅनलमध्ये घेण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी अाणि भाजप या दाेन्ही पक्षांच्या पॅनलच्या बैठका हाेणार अाहेत.

पालकमंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये इतर संस्था मतदारसंघातून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात अाली अाहे. उमेदवारी मागे घेण्यापूर्वी सर्वपक्षीय पॅनल फुटून राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला अाहे. सर्वपक्षीय पॅनलमधून राष्ट्रवादीला बाहेर काढले, की ते बाहेर पडले? हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, देवकर गटाने राष्ट्रवादीसाेबत जाता खडसेंच्या पॅनलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला अाहे. चिमणराव पाटील यांनीही देवकर अामच्याच साेबत असल्याचे म्हटले अाहे. दरम्यान, बाळासाहेब पाटील, अॅड.रवींद्र पाटील, अार.जी.पाटील, राजीव देशमुख ही मंडळी मात्र राष्ट्रवादीच्या पॅनलमध्येच अाहे.

राष्ट्रवादीच्या पॅनलचा निर्णय घेण्यासाठी पक्ष कार्यालयात रविवारी सकाळी १० वाजता बैठक अायाेजित करण्यात अाली अाहे. या बैठकीत अामदार डाॅ.सतीश पाटील, खासदार ईश्वरलाल जैन हे पॅनलची अधिकृत घाेषणा करतील. तसेच रविवारी दुपारी वाजता लाडवंजारी मंगल कार्यालयात भाजप-शिवसेनेच्या सहकार पॅनलचा मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. या वेळी पालकमंत्री एकनाथ खडसे, खासदार ए. टी. पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अामदार गुलाबराव पाटील, किशाेर पाटील, चिमणराव पाटील, विशाल देवकर, वाल्मिक पाटिल, विष्णू भंगाळे यांची उपस्थिती राहणार अाहे.

काही जागांवर बदल
दाेनदिवसांतील राजकीय घडामाेडीनंतर सर्वपक्षीय पॅनलमध्ये बदल करण्याची तयारी भाजपकडून केली जात अाहे. अागामी काळातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन काही जागांवर बदल करण्याच्या हालचाली शनिवारी झाल्या. सर्वपक्षीय पॅनलमध्ये येण्यासंदर्भात वाल्मीक पाटील, विष्णू भंगाळे यांनी शनिवारी खडसेंची भेट घेत चर्चा केली.

चाेपड्याच्या निर्णयाचे अाश्चर्य
सर्वपक्षीयपॅनलमध्ये शिवसेनेच्या काेट्यातून नाव निश्चित असलेल्या माजी अामदार कैलास पाटील यांनी शेवटच्या क्षणी पक्षातील काेणत्याही वरिष्ठाला किंवा सर्वपक्षीय पॅनलच्या नेत्यांना सांगताच माघार घेतली. यापूर्वीही विधान परिषद निवडणुकीत पाटील यांनी माघार घेतली हाेती. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनलमध्ये नाव निश्चित असताना कैलास पाटील यांनी माघार घेतल्याने खुद्द शिवसेनेच्याच नेत्यांनी अाश्चर्य व्यक्त केले.

विष्णू भंगाळे काेणासाेबत?
सर्वचपक्षांत गाेतावळा असलेले विष्णू भंगाळे उमेदवारी माघारीच्या दिवशी राष्ट्रवादी अाणि भाजप या दाेन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात हाेते. सर्वपक्षीय पॅनलमध्ये स्थान मिळाल्याने ते शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात अाले. जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील त्यांनी डाॅ.सतीश पाटील यांची भेट घेतली. पालकमंत्री खडसेंच्या निराेपावरून त्यांनी महिला राखीव मतदार संघातून संगीता भंगाळे यांची माघार घेतली. मात्र, अाेबीसी मतदारसंघात त्यांची उमेदवारी कायम ठेवली. राष्ट्रवादीने अाेबीसीमधून उमेदवारी द्यावी, म्हणून ते प्रयत्नशील हाेते. शनिवारी मात्र त्यांनी राष्ट्रवादीला साेडून सर्वपक्षीय पॅनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यामुळे भंगाळे नेमके काेणासाेबत? याबाबत दाेन्ही पक्षांमध्ये शनिवारी संभ्रम निर्माण झाला हाेता. रविवारी हाेणाऱ्या दाेन्ही पॅनलच्या मेळाव्यानंतर भंगाळे
काेणासाेबत? हे स्पष्ट हाेईल.
राष्ट्रवादी कार्यालयात शुक्रवारी विष्णू भंगाळे अािण वाल्मीक पाटील या दाेघांनी राष्ट्रवादीतर्फे पॅनलसाठी हजेरी लावली हाेती.