जळगाव - खाविआने राष्ट्रवादीला पाठिंबा मागितला नव्हता, असे वक्तव्य करून खाविआच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचा अपमान केला आहे. आम्ही तटस्थ राहिल्यामुळेच खाविआला सत्ता स्थापन करता आली हे उघड आहे. त्यांना आमच्या पाठिंब्याची गरज आहे किंवा नाही हे लवकरच कळेल.
खाविआ-राष्ट्रवादी वादासंदर्भात नगरसेवकांचा गट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची भेट घेणार आहे. पक्षाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याकडे पुढील भूमिकेबाबत मार्गदर्शन घेणार असल्याचे गटनेते सुरेश सोनवणे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. खाविआला पाठिंबा न देणे यामागे कोणतेही पद मागणे हा उद्देश नाही तर आमच्या वॉर्डातील कामे होत नसल्याची नाराजी आहे. यासंदर्भात पालकमंत्री आणि पक्षाच्या पदाधिकार्यांकडे देखील गार्हाणे मांडले आहे. परंतु न्याय मिळत नसल्याने पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितरीत्या खाविआसोबत न राहण्याचा निर्णय घेतल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.