आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Party Workers Dispute In Jalgaon, Eye On Parent Minister Gulab Devkar

गटबाजीबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा ‘भाऊबंदकी’ उफाळली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत इतर आघाड्यांच्या प्रमुखांना डावलल्याचे पडसाद पक्षात उमटले आहेत. या निमित्ताने गटबाजीचा संबंध पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या गटाशी असल्याने देवकरांपुढे लोकसभेपूर्वीच अंतर्गत वाद मिटवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या वादाबाबत पालकमंत्री काय भूमिका घेणार, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

गटबाजी चव्हाट्यावर आल्यानंतर दोन वर्षांपासून प्रदेशस्तरावरून वाद मिटवण्याचे प्रयत्न झाले. गेल्या सहा महिन्यांत त्यात काहीसे यशही आले होते; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील असंतोषाला तोंड फुटले आहे. बूथ कमिट्यांसाठी घेण्यात आलेल्या बैठकीला अनेक जणांना डावलल्याचे कारण निमित्तमात्र ठरले आहे. जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्यांनी थेट आरोप केले आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष हे पालकमंत्री देवकरांच्या गटाचे असल्याने ही नाराजी थेट त्यांच्यावर असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.