आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा‌ष्ट्रवादीच्या घड्याळाची वेळ चुकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राजकारणात खराब ‘वेळ’ असलेल्या राष्ट्रवादीची साेमवारी पुन्हा एकदा वेळ चुकली. बंॅकेच्या निवडणुकीत पॅनल तयार करण्याची वेळ चुकल्याने अाधीच पानिपत झालेल्या राष्ट्रवादीला उशिरा जाग अाल्याने कसेबसे पॅनल तयार केले. मात्र, लढतीत सुटसुटीतपणा येण्यासाठी संपूर्ण पॅनलकरिता एकसमान चिन्ह घेण्यासाठी निघालेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी १० मिनिटे उशिरा पाेहाेचल्याने चिन्हवाटपात त्यांना दिलेली वेळ चुकली. परिणामी, पॅनलमधील सर्वच उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार अाहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीची ‘वेळ’ खराब असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत अाहे.

जिल्हा बंॅक िनवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी शेवटची मुदत हाेती. तसेच साेमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांच्या दालनात चिन्हवाटपासाठी सर्वांना वेळ देण्यात अाली हाेती. त्यानुसार सकाळी ११ वाजता अामदार सुरेश भाेळे हे त्यांच्या पॅनलची यादी घेऊन उपस्थित हाेते. संपूर्ण पॅनलला एकच चिन्ह द्यावे, अशा अाशयाचा अर्ज त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला. तसेच भाजप-शिवसेनाप्रणीत सर्वपक्षीय पॅनलला मागणीनुसार ‘माेटारगाडी’ हे चिन्ह देण्यात अाले. दरम्यान, चिन्ह घेण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी ११ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात पाेहाेचले. मात्र, ताेपर्यंत चिन्हवाटप पूर्ण झाले हाेते. अाम्ही वेळेवर अालाे. परंतु, अामच्या कार्यकर्त्यांना अाणि उमेदवारांना दालनाबाहेर बसवून ठेवण्यात अाल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात अर्धा तास वाद सुरू हाेता. मात्र, राष्ट्रवादीची ‘वेळ’ चुकल्याने त्यांना समान चिन्ह देण्यास स्पष्ट नकार देण्यात अाला.

अपक्ष उमेदवार
भडगाव-याेगेशपाटील (विमान), भुसावळ- अाेंकार वारके (विमान), चाळीसगाव- सरदारसिंग पाटील (कपबशी),शिवाजी राऊत (पतंग), मनाेज साबळे (विमान),चाेपडा- जयवंतराव पाटील (विमान),यावल- अार.जी. पाटील (विमान),कपील सराेदे (पतंग),महिला- अरुणा पाटील(अलमारी), महानंदा पाटील (विमान), मंगला पाटील(पतंग), संगिता पाटील (कपबशी), एस.सी/ एस.टी- पिरन अनुष्ठान- (एसी),नामदेव बाविस्कर (कपबशी), एन.टी- देवंेद्रसिंग पाटील (पतंग),विलास भालेराव (कपबशी),मनाेज साबळे (विमान), अाेबीसी- पुरुषाेत्तम चाैधरी (कपबशी), विजय नारखेडे (छत्री), विष्णू भंगाळे (विमान) इतर संस्था- सुमंत नेवे (विमान), डी.डी. पाटील (अाकाशकंदील), प्रदीप पाटील (जीपगाडी).

मुक्ताईनगर -एकनाथ खडसे, धरणगाव- संजय पवार, पाराेळा- चिमणराव पाटील, एरंडाेल- अमाेल पाटील, जळगाव- सुरेश भाेळे अादींची बिनविराेध निवड झाली अाहे.

राष्ट्रवादीप्रणीत लाेकमान्य शेतकरी पॅनल
अमळनेर-पद्माकर गाेसावी (विमान), बाेदवड -रवींद्र पाटील (विमान), चाळीसगाव -राजीव देशमुख (ढाल-तलवार), चाेपडा - सुरेश पाटील (टेबल), जामनेर- नाना पाटील (कपबशी), पाचाेरा- खलील देशमुख (कपबशी), रावेर- अरुण पाटील (ट्रॅक्टर), यावल- विनाेदकुमार पाटील (टेलिव्हिजन), महिला राखीव- कल्पना पाटील (छत्री), एस.सी/ एस.टी -अविनाश भालेराव (विमान), एन.टी.- मंगेश पाटील (छत्री), अाेबीसी- बाळासाहेब पाटील (अाॅटाेरिक्षा), इतर संस्था- प्रशांत चाैधरी (कपबशी). लढत नसलेल्या जागा - महिला एक, भुसावळ, भडगाव

भाजप अन‌् शिवसेनाप्रणीत सहकार पॅनल
अमळनेर-अनिल भाईदास पाटील, भडगाव- नानासाहेब पाटील, भुसावळ- संजय सावकारे,बाेदवड- प्रतिभा राणे, चाळीसगाव- कैलास सूर्यवंशी, जामनेर- गिरीश महाजन, पाचाेरा- किशाेर पाटील, रावेर- नंदकिशाेर महाजन, यावल -गणेश नेहेते, महिला राखीव- राेहिणी खडसे, तिलाेत्तमा पाटील,एस.सी/ एस.टी-चंद्रकांत साेनवणे, एन.टी- वाडीलाल राठाेड, अाेबीसी- ए.टी. पाटील, इतर संस्था -गुलाबराव देवकर, लढत नसलेल्या जागा - चाेपडा.
(सर्वचिन्ह- माेटारगाडी)
बातम्या आणखी आहेत...