आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलातही दिसतो प्रादेशिक असमतोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राजकारणातआपणास नेहमीच प्रादेशिक असमतोल बघायला मिळतो. त्याचप्रमाणे राज्याच्या पोलिस दलातही समतोल नसल्याची बाब निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना दिल्‍या जाणाऱ्या भत्त्यातून उघड झाली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्द्यानुसार निवडणूक भत्ता मिळतो. मतदारांचे मत ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाल्यानंतर त्या मतदान यंत्राचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र दमडीही मिळत नाही.

मुंबई पोलिसांना भत्ता
मुंबईतबंदोबस्तास असलेल्या पोलिसांना रुपये ९४ पैसे प्रतितास याप्रमाणे ३६ तासांचा २५० रुपये भत्ता दिला जातो. लोकसभा निवडणुकीचा हाच भत्ता दुप्पट म्हणजे ५०० रुपये दिला गेला. जळगावात मात्र मतदान यंत्रांच्या संरक्षणासाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र दमडीही दिली नसल्याने या भेदभावाबद्दल पोलिसांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

...तर भत्ता दिला जात नाही
शासननिर्णयाप्रमाणे मतदान प्रक्रियेतील फक्त बूथमध्ये आणि मतमोजणी कक्षात बंदोबस्तास असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच भत्ता दिला जातो. स्‍ट्रॉं ग रुममध्ये असणाऱ्या आणि मतदान मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर अंतराबाहेर कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ता देता येत नाही. राहुलमुंडके, निवडणूकनिर्णय अधिकारी,जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
शिस्तीचे दल असल्याने मर्यादा
एखाद्यासरकारी कर्मचाऱ्यावर अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचारी संघटना आवाज उठवतात. पोलिस दल मात्र शिस्तीचे दल असल्याने त्यांची संघटना राज्यात नाही. त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था पोलिसांची आहे. लोकशाहीच्या या सणात पोलिसांचे मनोबल राखण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची मागणी पोलिस दलातून केली जात आहे.

मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने पी-१, पी-२ आणि पी-३ अशा तीन ‌श्रेणींमध्ये वर्गवारी केली आहे. यात मतदान केंद्राच्या अंतराप्रमाणे भत्ता कमी-जास्त दिला जातो. केंद्राध्यक्षाला २,२०० ते २,३०० रुपयांपर्यंत, मतदान अधिकाऱ्यांना १,५०० ते १,७०० रुपयांपर्यंत तर केंद्रावरील सुरक्षा कर्मचाऱ्याला ८०० रुपये दिले जातात. मतदान यंत्रांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र एक रुपयाही भत्ता दिला जात नाही.