आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षात केवळ दोन वेळाच पाहता आला हा किल्‍ला, वाचा काय आहे इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - नवापूर शहरालगत असलेल्या गुजरात राज्यातील उकई धरणाची जलपातळी कमी झाल्याने पिलाजीराव गायकवाड संस्थानाचा पाण्यात बुडालेला किल्ला दुसऱ्यांदा पाण्याबाहेर आला. किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. नवापूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या जामली गावात तापी नदी उकई धरणात असलेल्या किल्ल्याचे १९९७ नंतर पुन्हा नागरिकांना दर्शन घडले आहे. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी गर्दी झाली.
पाण्यातून बाहेर आलेल्या या किल्ल्याबद्दल बिलडिया वसावे या ६० वर्षीं वृद्धाने 'दिव्य मराठी'ला माहिती दिली ते म्हणाले की, ५० वर्षांत हा किल्ला दोन वेळा बाहेर आला आहे. पहिल्यांदा १९९७मध्ये पाण्याबाहेर आला होता. त्या वेळी येथील लोकांनी एक तोफ काढून नेली होती. सोनगड पोलिसांनी ती जप्त करून घेतली होती. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत इतिहासप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या किल्ल्यात एक विहीर आहे. त्यातून पूर्वी लोक पाणी भरत असत. पिलाजीराव गायकवाड यांनी इ.स. १७२९ ते १७६६ दरम्यान सोनगड किल्ला उभारला. उत्तर दिशेकडून येणारे शत्रू डाेंगरी क्षेत्रात पकडण्यासाठी जामली किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली.
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या संकल्पनेतून सन १९६०च्या दशकात उकई धरणाची निर्मिती झाली. धरणाच्या निर्मितीनंतर हा किल्ला पाण्यात बुडाला होता. किल्ल्यावरील तोफ, हत्यारे इतर वस्तूही पाण्यात बुडाल्या होत्या. नवापूर शहराला लागून असलेल्या उच्छलजवळील जामली गावापासून किलोमीटर पाण्यातून प्रवास करून धरणाच्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या लोकांकडून हौशी नागरिकांना किल्ल्यापर्यंत पोहोचवले जात होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ल्यावर प्रवेशबंदी केली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने किल्ल्याचे खरे रूप समोर आले असून, त्यावर ठेवण्यात आलेली तोफ इतर वस्तू पाहण्यासाठी गर्दी होत आहे. याआधी १९९७ साली हा किल्ला धरणाचे पाणी ओसरल्याने दिसून आला होता.
पुढील स्‍लाइड्सवर जाणूून घ्‍या या किल्‍ल्याविषयी खास बाबी, पाहा फोटो..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...