आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरच्या नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्याचे घरफोडीने स्वागत! रोख रकमेसह दागिणे लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर - शहरातील वेडूभाई गोविंदभाई राजपूत नगरात रविवारी रात्रीच्या दोन घरफोड्या करून हजारोंचा मुद्देमाल आणि दागिणे लंपास करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, रविवारीच नवनियुक्त पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यामुळे, चोरट्यांनी घरफोडीने पोलिस अधिकाऱ्याचे स्वागत केले अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. 
नवीन अधिकारी शहरात आले आणि चोरट्यांनी पहिल्याच दिवशी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे. 
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास वेडूभाई गोविंदभाई राजपूत नगरात दोन शिक्षकांच्या घरात चोरीची घटना घडली. यात शिक्षक राजेंद्र मोरे हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. तर शिक्षक दाम्पत्य नितिन वसावे व त्यांच्या पत्नी उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गावी गेले होते. चोरट्यांनी घरावर डल्ला मारत राजेंद्र यांच्या घरातून 13 हजार 500 रुपये व जवळपास 8 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. तर नितिन वसावे यांच्या घरातील सामान आस्तवस्त करून किरकोळ चोरी झाल्याची तक्रार नवापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 
नवापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटरसायकल चोरी, घरफोडी, बांधकाम साहित्य चोरी, टायर चोरी अश्या अनेक चोरीचे प्रमाण वाढले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...