आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाणी अन‌् घागर फुंकून देवीचा जागर, घागरी फुंकण्याचा कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; नवरात्राेत्सवात अष्टमीच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. मंगळवारी दुपारपासून अष्टमीला सुरुवात झाली. तिची बुधवारी दुपारी सांगता हाेणार अाहे. यानिमित्त काेकणस्थ ब्राह्मण महिला महालक्ष्मी मंडळातर्फे बळीरामपेठेतील ब्राह्मण सभेत घागरी फुंकण्याचा कार्यक्रम घेण्यात अाला. दुपारी १२ वाजता पूजा संध्याकाळी वाजता तांदळाच्या पीठापासून महालक्ष्मीचा मुखवटा तयार करून त्याचीही पूजा करण्यात आली. समाजातील नवविवाहित महिलांनी पूजा केली. या वेळी विविध खेळ गाणी म्हणत जागर करण्यात अाला.

यामध्ये ‘देवी तुझ्या स्वरुपात मन झाले दंग’,‘जात्यावरी दळताना गाते अाेवी अाईची, जगावरी छत्रछाया माता अंबाबाईची’ यासारखी गाणी गाण्यात अाली. त्यानंतर संस्कृती पवनीकर हिच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कुमारिका पूजनही करण्यात अाले. या वेळी महिलांना शक्ती, सामर्थ्य, धैर्य मिळावे, अशी प्रार्थना देवीला करण्यात अाली. कार्यक्रमासाठी अंजली गाडगीळ, चित्रा जाेगळेकर, हेमा लिमये, वर्षा अाेक, मीरा गाडगीळ, कल्याणी घारपुरे, माधुरी अाेक, वंदना अाेक यांनी सहकार्य केले.

कुमारिकांचे पूजन
यावेळी अनेक ठिकाणी मंगळवारी हाेम करण्यात अाले. तसेच काही ठिकाणी बुधवारी हाेमहवन करण्यात येणार अाहे. तसेच कुमारिका पूजनाचा कार्यक्रमही घेण्यात अाला. यात हळद-कुंकू लावून मुलींचे पाय धुऊन पूजा करण्यात आली. नंतर त्यांना प्रसाद देऊन भोजन देण्यात आले. देवीचे रुप म्हणून कुमारिकांची पूजा केली जाते.