आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावण दहनानिमित्त नव्या राजकीय मैत्रीचा जन्म, आ. भोळेंचा उल्लेखही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शहराच्या राजकारणात सक्रिय सहभागाचे संकेत मिळू लागले अाहेत. महिनाभरापूर्वी नवीन पर्वाला सुरुवात हाेण्याचे संकेत देणाऱ्या महाजन यांच्या हस्ते दसऱ्याला हाेणारे रावण दहन हा त्याचाच भाग असल्याचे अाता बाेलले जात अाहे. यानिमित्त शहरात सर्वत्र झळकणारे एल. के. फाउंडेशनचे हाेर्डिंग त्यावरील फाेटाे हे त्याचेच द्याेतक मानले जात अाहे.
मनसेचे गटनेते ललित काेल्हे यांच्या एल. के. फाउंडेशनच्यावतीने २२ अाॅक्टाेबर राेजी सायंकाळी मेहरूण तलावाच्या काठावर रावण दहनाचा जंगी कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला अाहे. यासाठी शहरात प्रसिद्धी प्रचारासाठी माेठे हाेर्डिंग लावण्यात अाले अाहेत. यावर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा माेठा फाेटाे असून साेबत महापाैर राखी साेनवणे, उपमहापाैर सुनील महाजन, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, भाजपचे गटनेते डाॅ. अश्विन साेनवणे, विराेधी पक्षनेते वामनराव खडके, राष्ट्रवादीच्या गटनेत्या दीपाली पाटील, जनक्रांतीचे गटनेते सुनील पाटील यांना स्थान दिले अाहे. विशेष म्हणजे पालकमंत्री एकनाथ खडसे अामदार सुरेश भाेळे यांचा उल्लेखही नाही. दरम्यान, खडसेंमुळे नाराज झाल्याने कोल्हे यांनी महाजनांशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

तलावाकाठीसाफसफाई : एल.के. फाउंडेशनच्यावतीने शहरात सुरू असलेल्या साफसफाई अभियानांतर्गत मंगळवारी सकाळी मेहरूण तलावाच्या काठावर माेहीम राबवण्यात अाली. या वेळी तलावाकाठी सपाटीकरण करणे, कचरा उचलणे, झाड झुडुपे काढण्यात आले.
वाईट प्रवृत्तीचा विनाश
अायाेजकांनीहाेर्डिंगवर ‘शहर विकासाच्या मुहूर्तमेढीला.... वाईट प्रवृत्तीच्या विनाशाला.. अवश्य या रावण दहनाला...’ असे लिहिलेले घाेषवाक्य शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत अाहे. यामागे अायाेजकांना नेमका काय संदेश द्यायचा अाहे, यावरही अाता खल सुरू अाहे. नेमक्या काेणत्या वाईट प्रवृत्तीचा विनाश रावण दहनानिमित्त करायचा अाहे, असाही प्रश्न उपस्थित हाेेत अाहे. शहरात सद्या चर्चेत असलेल्या या हाेर्डिगमुळे अागामी काळात नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ पाहायला मिळेल, असा अंदाज बांधला जात अाहे.