आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दांडियाच्या तालावर थिरकणार तरुणाईची पावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नऊ रंगांची, नवचैतन्याची, नऊ शक्तिरुपांची आराधना केला जाणारा नवरात्रोत्सवाचा सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त बाजारही सजला आहे. सुभाष चौकात दुकाने थाटायला लागली असून गरबा, दांडियासाठी दुर्गोत्सव मंडळांची तयारीही झाली आहे.
ड्रेसेसचा वेगळा लूक
गरबा खेळण्यासाठी पारंपरिक वेशभूषा, आभूषणांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध झाले आहेत. बाजारात गरब्याचा घागरा, ओढणी, राजस्थानी वर्कमधील गोंडे लावलेले, राजस्थानी कलाकारी एम्ब्रॉयडरी केलेले घागरे पाहायला मिळत आहेत. तसेच मेटलचे कडे, कंबरपट्टा, बाजूबंद, मोठे हार, पायातील कडे, साखळ्या, बोरपाथी यासारखे पारंपरिक दागिनेदेखील उपलब्ध आहेत. पुरुषांच्या वेशभूषेत काठेवाडी पगडी, धोतरासारखी पॅन्ट, राजस्थानी वेशभूषेतील ड्रेसची मागणी आहे.
रंगीबेरंगी ड्रेसेसची बाजारात धूम आहे.

ड्रेस लहान मुलांचे 300 ते 1200 रुपयांपर्यंत तर मोठ्यांचे 800 ते 2 हजार पर्यंत. ज्वेलरी - गळ्यातील हार 60 ते 600, कमरपट्टा 70 ते 400, बिंदी 30 ते 100 रुपयांपर्यंत, कडे 50 ते 200 रुपये जोडीपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. प्रल्हाद शामनाणी, रंगोली ड्रेसेस
लटकन, पत्रा टिकली, घुंगरू, गोंडे हे प्लेन घागऱ्याला सजवण्यासाठी वापरण्यात येतात. साध्या घागऱ्याला घरबसल्या डिझायनर लूक देता येत.

अर्जुन मंधाण, सपना ड्रेसेस
आदर्शनगरातील सुनील शर्मा हे अनेक वर्षांपासून कॉलकाताला जाऊन मूर्ती आणतात. यंदाही त्यांनी कोलकाताच्या खिरनी मार्केटमधून सव्वा फुटाची अष्टभुजा रुपातील मूर्ती आणली आहे. यात साडीचे रंग दिवस आणि रात्रीच्या प्रकाशाप्रमाणे बदलतात. ऑरेंज रंगाची साडी परिधान केलेली देवीची मूर्ती आहे. त्यावरील फुले रात्री खुलून दिसतात. पांढ-या रंगाची ही फुले रात्री प्रकाशाप्रमाणे खुलून येतात. मूर्तीसाठी त्यांनी सहा बाय सहा आकाराचे मंदिर राजस्थानी कारागिराकडून खास बनवले आहे.