आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी लगबग; प्रशासनाची तयारी, बंदोबस्त वाढवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारपासून अर्ज विक्री दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी ख-या अर्थाने रणधुमाळीला गुरुवारपासून म्हणजे घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती येणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक आजी- माजी आमदार शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील महायुती आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप होऊ शकलेली नसताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भाजपच्या इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. असे असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांना तयारी करून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी गुरुवारपासून पाहायला मिळणार अाहे. पितृपक्षामुळे सबुरी घेतलेल्या इच्छुकांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत घर तसेच कार्यालयापासून शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे िनयाेजन केले अाहे. खान्देशातील सर्वच पक्षांमधील प्रबळ दावेदार अापला अर्ज दाखल करणार आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरातून, रावेरमधून आमदार शिरीष चौधरी, पाचो-यातून आमदार दिलीप वाघ, एरंडोलमधून शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील, मनसेचे नरेंद्र पाटील. शहाद्यातून शिवसेनेचे राजेंद्र गावित, भाजपकडून जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जण अर्ज दाखल करतील. तसेच शुक्रवारीदेखील अनेकांनी तयारी केली असल्याने तहसील कार्यालयात होणा-या गर्दीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.