आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गादेवीच्या स्वागताला भाविक झाले सज्ज, नवरात्रोत्सवात वाहन बाजार सुसाट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंदीचाफटका सोसणा-या ऑटोमोबाइल क्षेत्राला गेल्या आठवड्यापासून चांगले दिवस आले आहेत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तब्बल १९३ कार आणि ७०२ दुचाकी वाहनांची बुकिंग होवून घटस्थापनेच्या मुहूर्तावर वितरण केले जाणार आहे. या शिवाय इलेक्ट्रानिक्सच्या वस्तुंनाही ग्राहकांकडून मागणी वाढली असून शेकडो वस्तूंची विक्री उत्सवादरम्यान हाेण्याचा अंदाज आहे.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने जून-जुलै हे दोन्ही महिने वाहन शोरूम मालकांसाठी मंदीचे गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवातही या क्षेत्राला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. आता मात्र घरी नवे वाहन आणून घटस्थापनेचा मुहूर्त साधण्याची तयारी सुरू आहे. या दहा दिवसांत बहुतेक नागरिकांचा कुठली ना कुठली वस्तू खरेदीकडे कल दिसून येतो. या व्यवसायात दीडपट वाहनांची बुकिंग दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कारखरेदीकडे कल : सध्यामार्केटमध्ये येणाऱ्या नव्या चारचाकी वाहनांची मागणी वाढली आहे. मारूतीची सीएझ कार बाजारात येण्यापूर्वीच तिचे बुकींग सुरू झाले आहे. काहींनी आधीच मॉडेलची निवड करून घटस्थापनेचे बुकिंग करून घेतले। आहे. तर सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलमधूनही निवड करून मुहूर्त साधण्याचा प्रयत्न काही ग्राहकांनी केला आहे. एकूणच कार खरेदीकडे कल दिसून येत आहे.