आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत, ढोलताशांच्या गजरात तरुणाईचे नृत्‍य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दुर्गेदुर्गट भारी तुझविण संसारी ... यासह जयभवानीच्या जयघोषात गुरुवारी घटस्थापना करण्यात आली. नऊ रात्रींसाठी देवीची भक्तिभावाचे पूजा करण्यासाठी शहर आणि परिसरातील वातावरण भारावून गेले आहे. सार्वजनिक नवरात्राेत्सव मंडळांतर्फे ढोल-ताशांच्या गजरात देवीचे स्वागत करण्यात आले. घटस्थापनेसाठी सूर्योदयापासून ते ११.३० पर्यंत मुहूर्त असल्यामुळे, बाजारपेठेत सकाळी सहा-साडेसहा वाजेपासून सगळीकडे फुले, पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी जमली होती.
विविध मित्रमंडळांनीही देवीची विधिवत स्थापना केली. गरबा, दांडियाची तयारी आधीपासूनच झाली होती. आता तरुणाईला नवरात्राच्या पहिल्याच माळेपासून दांडिया-गरबा खेळण्याचे वेध लागले होते. नवीपेठ मित्र मंडळातर्फे आयोजित दांडिया रासमध्ये तरूणींनी नृत्य सादर केले. प.न.लुंकड कन्याशाळेने काढली मिरवणूक लुंकडकन्या शाळेत श्री शारदा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. मंत्रोच्चाराच्या गजरात शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष .अ.वा.अत्रे यांनी शारदादेवीची स्थापना केली. संस्थेच्या चिटणीस योगिनी बाकरे, सदस्य लता पाटणकर, डॉ.शरद केळकर, मेघा कुलकर्णी, मुख्याध्यापिका स्वाती पवार उपस्थित होत्या.

आदिशक्तीचा जयघोष
दुर्गा मूर्तींच्या किमती स्थापनेच्या दिवशीही घसरत असल्याने शेवटच्या घटकात मूर्ती घेण्यासाठी कार्यकर्त्यांसह दुर्गाभक्तांनी टॉवरचौक, अजिंठा चौफुली, महाबळ, बहिणाबाई उद्यान परिसरात गर्दी केली होती. मोठ्या दुर्गात्सव मंडळांनी दुपारी वाजेपासून मिरवणुकांना सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात अंबेमातेच्या जयघोषात वाहनावर आदिशक्तीची मूर्ती ठेवून प्रमुख मार्गावरून स्थापनेच्या ठिकाणापर्यंत नेली. यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. गुरूवारपासून शहरातील विविध भागात दांडियारासचा उत्सव रंगण्यास सुरूवात झाली. नऊ दिवसांच्या उत्सवात तरुणाई दांडियारासात तल्लीन हाेऊन जाईल. यासाठी शहरातील विविध दुर्गात्सव मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांसह गरबा दांडियाचेही नियोजन केले आहे.