आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवदुर्गेच्या नऊ रूपांचे नृत्यातून सादरीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवरात्रोत्सवानिमित्त मू. जे. महाविद्यालयाच्या ओजस्विनी कला विभागातर्फे सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नऊ मुलींनी नवदुर्गेचे रूप धारण करीत मंत्रांवर नृत्याचे सादरीकरण केले, यात देवीची नऊ रूपे सांगण्यात आली. यामध्ये ‘या देवी सर्व भुतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नम:’ या मंत्रावर आधारित वेगवेगळ्या रूपांचे यात समावेश करून सादरीकरण करण्यात आले. यामध्ये लक्ष्मीरूपमवर भाग्यश्री बोरसे, शांतिरूपमकांचन राठोड, श्रद्धारूपम सुजाता बडगुजर, शक्तिरूपम् श्रृती मारसकर, स्मृतिरूपम् कोमल चव्हाण, दयारूपम माधुरी लखिगरा, लज्जारूपम् प्रियंका जोशी, कांतिरूपम् प्रियंका पाटील, बुद्धिरूपम् अंजली चव्हाण यांनी सादरीकरण केले. यांच्या नृत्याचे दिग्दर्शन विशाखा सपकाळे हिने केले. यात विद्यार्थ्यांनी नवदुर्गेचे चित्रमय स्वरूपही साकारले आहे. 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोंबर दरम्यान हे चित्रमय प्रदर्शन सर्वांसाठी ओजस्विनीच्या कलादालनात खुले ठेवण्यात आले आहेत. ही संकल्पना वैशाली सिंत्रे यांची असून चित्र राजू भुईकर यांनी रेखाटली आहेत तर कॅलिग्रॅफी सूर्यकांत वाघमारे यांनी केली आहे. प्राचार्य अविनाश काटे यांनी मार्गदर्शन तर हिरकणी फेगडे, पुरुषाेत्तम घाटोळ, योगेश लहाणे, गोपाल पाटील, स्नेहा चव्हाण, मनोज पवार, निशिकांत पाटील, नितीन चव्हाण यांचे सहकार्य मिळाले.