आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी हे तर देशाचे मित्र;मिलिंद तेलतुंबडे नातेवाईक असल्याचे आंबेडकरांनी केले मान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. परंतु सरकार शत्रू समजून त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही. नक्षलवाद्यांमध्ये काही बुद्धिवादी लोक आहेत, अशा शब्दात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नक्षलवाद्यांचे समर्थन केले.
पक्षाच्या मेळाव्यानिमित्त गुरुवारी जळगावात आलेल्या अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कॉँग्रेसने ‘सलवा जुडूम’सारखी संघटना तयार करून 60 हजार नक्षलवादी व आदिवासींना ठार मारले. छत्तीसगड हल्ल्यातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे हा माझा नातेवाईक आहे, परंतु तो त्याचे काम करीत आहे, मी माझे काम करत आहे. ‘फायर विथ फायर’ या पद्धतीने नक्षलवाद्यांशी लढणे अशक्य आहे. यामुळे सरकारनेही नक्षलवाद्यांना समजावण्यासाठी लोकशाही मार्गाचा आदर करणार्‍यालोकांचा गट तयार करावा. तसेच या भागात शिक्षणासारख्या सुविधेची व्यवस्थाही करावी, असेही ते म्हणाले.

कॉँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष कमकुवत आहेत. दोघांनाही लोकसभेत 100 हून कमी जागा मिळतात; मात्र घटक पक्षांच्या जोरावर त्यांनी ‘एनडीए’ आणि ‘यूपीए’ अशा नावाने लॉबिंग केले आहे. मीडियाने प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र सर्व्हे केल्यास या दोन्ही पक्षांचे पितळ उघडे पडेल, असे अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले.