आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCC Admission Now Start In June Month. Divya Matathi

जूनमध्ये एनसीसीचे नवीन प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जून महिन्यात जिल्ह्यातील 9 महाविद्यालय आणि 23 शाळांमध्ये एकूण 410 विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे. या शिवाय वर्षभर साहस शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयांनी नवीन प्रवेश देताना निकषांचे पालन करावे, अशी माहिती कमांडिंग ऑफिसर के. व्ही. विठ्ठल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एनसीसीच्या जागा भरण्याची प्रक्रिया जूनमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल यांनी वर्षभराच्या कार्यक्रम, शिबिरांचा आढावा सांगितला आहे. यंदा इंटरबटालियनचे 4, ट्रॅक कॅम्प तर 2 नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प होणार आहेत.

कॅम्पसाठी यांची झाली निवड
भुसावळ येथे 18 ते 27 जूनदरम्यान होणार्‍या कॅम्पसाठी मू.जे. महाविद्यालय (75), नूतन मराठा (45), एएससी कॉलेज धरणगाव (19), एएससी कॉलेज जामनेर (18), नाहाटा महाविद्यालय भुसावळ (45), डी.एन.महाविद्यालय फैजपूर (21), बेंडाळे महाविद्यालय (26), बाहेती महाविद्यालय (31), जेई ज्युनियर कॉलेज मुक्ताईनगर (23), डी.एन.विद्यालय खिरोदा (3), म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर (7), आर.जी.हायस्कूल शेंदुर्णी (6), डीएनडब्ल्यूएम आर्शम पाल (2), न्यू इंग्लिश स्कूल जामनेर (7), आरआर विद्यालय (2), लाना सार्वजनिक विद्यालय (2), ए.टी. झांबरे विद्यालय (6), सेंट जोसेफ (3), टेमानी हायस्कूल भुसावळ (4), एम.जी.विद्यालय वरणगाव (7), डी.एस.हायस्कूल भुसावळ (8), डी.एल.हिंदी हायस्कूल भुसावळ (2), जेईएस मुक्ताईनगर (7), राका हायस्कूल बोदवड (3), नेहरू विद्यालय किनगाव (3), पीआरएचएस धरणगाव (8), एम विद्यालय सामनेर (7), एसएजीएचएस सावदा (2), ज्योती विद्यामंदिर सांगवी (3), न्यू इंग्लिश स्कूल भालोद (3), आदर्श विद्यालय कानळदा (7) आणि जवाहर नेहरू विद्यालय साकेगाव (11) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

3 ट्रॅक तर 2 नॅशनल कॅम्प
यंदा 3 ते 12 जूनदरम्यान पंजाब येथे, 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर नर्मदा ट्रॅक तर 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान कोल्हापूर येथे साहस शिबिर होणार आहे. तसेच 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर जिल्ह्यात आणि 23 डिसेंबर ते 3 जानेवारी 2015 दरम्यान केरळ येथील अलकपुझा येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प होणार आहे.