आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाविआसोबत जाण्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आगामी काळात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खान्देश विकास आघाडीला पाठिंबा देण्यास स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. त्यामुळे खासदार ईश्वरलाल जैन यांना घरचा आहेर मिळाला आहे. खाविआला पाठिंबा देण्यासाठी कोणी दबाव आणल्यास पदाचा राजीनामा देण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. आमदार डॉ. सतीश पाटील यांनीही नगरसेवकांना विश्वासात घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

महापालिकेतील सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादीच्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे खाविआला सत्ता स्थापन करणे शक्य झाले होते. परंतु वर्षभरात खाविआने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात एकही काम मंजूर केले नाही. तसेच कधीही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आगामी काळात खाविआसोबत जायचे नाही, असाच सूर व्यक्त होत होता. पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रही दिले होते. आता पुन्हा स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने सत्ता समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पत्रकारपरिषदेत घेतली भूमिका
राष्ट्रवादीचेनेते खासदार ईश्वरलाल जैन यांनी नगरसेवकांशी चर्चा करता थेट खाविआसोबत जाणार असल्याचे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महापालिकेत सर्व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन जैन यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. खाविआसोबत जाण्याची कारणे वरिष्ठांना पटवून देऊ त्यांचे मतपरिवर्तन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जर कोणी खाविआसोबत जाण्यासाठी दबाव आणला तर थेट नगरसेवकपदाचे राजीनामे देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आम्हाला कोणतीही सत्तेची लालसा नाही. विकासासाठी आम्ही योग्य निर्णय घेतला आहे. ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी एकही काम वॉर्डात केले नाही. त्यामुळे नेते तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे नगरसेविका अश्विनी देशमुख, गटनेते सुरेश सोनवणे, राजू मोरे यांच्यासह सर्वच नगरसेवक उपस्थित होते.

नगरसेवकांना विश्वासात घ्यायलाच हवे
नगरसेवकांच्याभूमिकेबाबत आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पक्षाचे नेते शरद पवार अजित पवार यांच्याशी मी स्वत: तसेच खासदार ईश्वरलाल जैन अरुणभाई गुजराथी यांनी चर्चा केली होती. भाजप खाविआला सत्तेसाठी राष्ट्रवादीची गरज लागणार असल्याचे सांगितले. नेत्यांनीही आम्हाला दोघांना अधिकार दिले होते. तसेच नगरसेवकांशी चर्चा करून भूमिका ठरवण्यात येणार होती. परंतु खासदार जैन यांनी कसे काय जाहीर केले कळत नाही.
सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. मी अरुणभाई आम्ही दोघे दोन दिवसांत नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर पाठिंब्याचा निर्णय घेऊ. परस्पर निर्णय घेतल्यास बुमरँग होण्याची शक्यता असते, अशी प्रतिक्रिया दिली.