आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलमुक्तीमुळे वाहनांचे नुकसान, विकास खुंटेल; राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दळणवळणाच्या दृष्टीने टाेलद्वारे व्यवस्थापन हाेणे महत्त्वाचे आहे. फडणवीस सरकारने सवंग लाेकप्रियतेसाठी टोलमुक्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे चांगल्या वाहनांचे नुकसान हाेईल, खराब रस्त्यांमुळे इंधन जास्त लागेल विकास खुंटेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राज्यात 12 टोलनाके कायमचे बंद करण्याच्या सरकारच्या घोषणेवरील प्रश्नाच्या उत्तरात पवार म्हणाले, रस्त्यांमुळेच विकास होतो, हे परदेश गुजरातच्या उदाहरणांवरून दिसते. गुजरातेत टोलच्या निधीतूनच रस्ते बांधकाम होत आहे. त्यामुळे तेथे औद्योगिक आणि पर्यायाने सर्वांगीण विकास झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मात्र सवंग लाेकप्रियतेसाठी टाेलनाके बंद केले जात आहेत. टोलमुक्ती हवी असेल तर चांगले रस्ते बांधणे दर्जा टिकवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरेसा निधी द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
"राज्य कुठे चालले हे लक्षात येते'
नागपूरच्याकेंद्रीय कारागृहातून कैद्यांनी केलेले पलायन, तेथील वाढते गँगवॉर याबाबत पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच िजल्ह्यात असे हाेत असेल तर शितावरून भाताची परीक्षा, या म्हणीप्रमाणे राज्य काेणत्या दिशेने चाललेय हे लक्षात येईल, असा चिमटा पवारांनी घेतला.