आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह 18 नगरसेवक भाजपमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/अमळनेर- अमळनेर येथे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह 18 नगरसेवकानी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने आमदार चौधरींना शह देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
 
राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असलेले व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पुष्पलता पाटील या सौभाग्यवती आहेत. 
नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, संजय मराठे, विवेक पाटील, रत्ना माळी, रत्नमाला महाजन, नरेंद्र संदनशिव, रामकृष्ण पाटील, शीतल यादव, सुरेश पाटील, चंद्रकला साळुंखे, संतोष पाटील, कमलबाई पाटील, राजेश पाटील, निशांतबानो पठाण, शेखा हाजी मिस्तरी, अभिषेक पाटील या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रांत पाटील फय्याज पठाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. 
 
दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर नगराध्यक्षा व नगरसेवक गेले तो त्यांचा निर्णय आहे मी मात्र राष्ट्रवादीतच आहे, असा खुलासा  माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...