आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याची स्पर्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- अंतर्गत लाथाळ्यांमुळे त्रस्त पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आपल्याच तव्यावर पोळ्या भाजण्याची स्पर्धा रंगली आहे. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी मुख्य खेळाडू आहेत. केवळ आम्ही म्हणू तेच खरे, हे जनतेवर लादण्यासाठी प्रत्येकाकडून शहराविषयी कळवळा असल्याचा आव आणला जातो. वस्तुस्थिती मात्र नगराध्यक्ष असोत की, शहराध्यक्ष दोघांच्या ‘करणी आणि कथनी’मधील फरक दाखवणारी आहे. एकीकडे रस्ते, पथदिवे, स्वच्छता, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा उडाला असताना, नगराध्यक्षांना कामे न झाल्याचे खापर पालकमंत्र्यांवर फोडून एकाच तिरात दोन निशाणे साधायचे आहे. तर नगराध्यक्ष नेमाडेंना अकार्यक्षम दाखवून लोणारींना या पदावरील आपला दावा अधिक भक्कम करायचा आहे.
विरोधाभासी भूमिका
पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता मिळवून देण्यात लोणारींचा वाटा महत्त्वाचा होता. त्याचे र्शेय त्यांना मिळालेच. मात्र, यशाचे र्शेय घेताना, जनतेने सोपवलेल्या जबाबदारीला बगल देता येणार नाही. एकीकडे विरोधकांच्या आंदोलनात वारंवार सहभाग घ्यायचा आणि दुसरीकडे याच मुद्दय़ांवर पालिका बैठकीत सत्ताधारी म्हणून मौन पाळायचे. रस्ते दुरूस्तीसाठी आंदोलन करताना रस्ते विकास निधी पडून असल्याचे आरोप करायचे, सभेत मात्र विरोधकांना थोपवताना नगराध्यक्षांची तळी उचलून धरायची, ही विरोधाभासी भूमिका घेण्याचे नेमके कारण काय?
दोन्ही गटांना समज
पदाधिकार्‍यांनी पक्षशिस्त कायम राखणे गरजेचे आहे. एकमेकांविरुद्ध पत्रकबाजी करणार्‍यांना कार्यकर्त्यांना समज देऊ. परिवार मोठय़ा झाल्यावर किरकोळ वाद सुरूच असतात. मात्र, यावर लवकरच तोडगा 6निघेल. गफ्फार मलिक, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव
संभ्रमात टाकणारे काही मुद्दे..दुसर्‍या बाजू अशा
>सत्तेत येऊन दोन वर्षे झाली. अपवाद वगळता गटनेते बैठकीला हजर नसतात. त्यांनी पक्षनिष्ठेचे उपदेश देऊ नयेत, अशी लोणारींची भूमिका आहे.
>पक्षाने लोणारींना शहराध्यक्ष, तर नईम पठाण यांना गटनेते केले. या अधिकारातून पठाण यांनी नोटीस काढली.
>सेना-भाजपच्या ‘खड्डय़ात मत्स्यपालन’ आंदोलनात लोणारींनी रस्ता विकास निधी पडून असल्याचा आरोप केला.
>भाजयुमोने जलक्रांती आंदोलन केले. दूषित पाणीपुरवठय़ाबद्दल पालिकेची अब्रू वेशीवर टांगली.
>तत्कालीन सभापती नंदा निकम यांनी नगराध्यक्षांवर तोफ डागली होती. पालिकेविरुद्ध धरणे आंदोलन केले.
>पक्षाची खरोखर काळजी असेल तर, दोन वर्षांपासून गटनेत्यांची अकार्यक्षमता लपवून ठेवण्याचा लोणारींचा उद्देश काय? त्यापासून त्यांना कोणी रोखले होते?
>तब्बल दोन वर्षांपासून निधी पडून असल्याची उपरती अचानक कशी? एवढे दिवस माहिती का दडवली.
>सत्ताधारी लोणारींनी ही समस्या सोडवण्याऐवजी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊन पालिकेची पिसे काढली.
>हे वाद मिटवण्याऐवजी शहराध्यक्ष लोणारींनी निकम यांच्या आंदोलनात भाग घेतला, तो कोणाला शह देण्यासाठी?
>पक्षशिस्त म्हणून नोटीसला उत्तर देण्याऐवजी लोणारींनी उलट गटनेत्यांच्या हकालपट्टीचा दम भरला.