आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मनपाच्या ठेवी शासनाला दिल्यास कर्जमाफी तातडीने शक्य- अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीचा जिल्हा मेळावा गुरूवारी जळगाव शहरातील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. - Divya Marathi
राष्ट्रवादीचा जिल्हा मेळावा गुरूवारी जळगाव शहरातील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.
जळगाव - राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी शासनाकडे निधी नसल्यामुळे अमलात येत नाही. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने नुकत्याच विविध बँकांमध्ये ६० हजार काेटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या अाहेत. यातील अर्धा निधी राज्य शासनाला कर्ज म्हणून दिला तरी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटेल अाणि उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांविषयीचे खरे प्रेम दिसेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले.       
 
राष्ट्रवादीचा जिल्हा मेळावा गुरुवारी जळगावात झाला. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली हाेती. गुरुवारच्या मेळाव्यात अजित पवारांनी ठाकरेंना खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘माझ्या ताेंडात काय काेंबले अाहे हे ठाकरेंनी कधी पाहिले हे माहिती नाही. त्यांना माहीत असेल तर सत्ता त्यांचीच अाहे. एकदा चाैकशी करून सत्य बाहेर अाणावे. शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवण्यासाठी राज्यभर गावाेगावी जाऊन बाेंबलत फिरण्याची गरज नाही. त्यापेक्षा माताेश्रीपासून जवळ असलेल्या मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून कर्जमाफीबाबत विचारणा करावी.  राज्य शासनाकडे पैसे नाहीत, पण मुंबई मनपाच्या ६० हजार काेटींच्या ठेवी बँकेत अाहेत. शासनाला फक्त ३४ हजार काेटी लागत अाहेत. यामुळे मुंबई मनपाचा निधी शासनाकडे सुपूर्द करावा म्हणजे कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी शक्य हाेईल. शेतकऱ्यांविषयी जास्तच प्रेम असेल तर हे पैसे शासनाला बिनव्याजी द्यावे.  सरकार तुमचे अाहे, तुम्ही काहीच दिले नाही हे माहिती असतानादेखील उद्धव ठाकरे सभांमध्ये किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली म्हणून विचारणा करीत असल्याचे अाश्चर्य वाटते.’  
 
बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची दातखिळी का बसते ? 
- उद्धव ठाकरेंच्या मनाेरंजनासाठी जाहीर सभांमध्ये डरकाळ्या फाेडणारे शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात मात्र चहा, काॅपी, नाष्टा घेऊन सुस्त पडतात. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये त्यांची का दातखिळी बसते? तेथे ते काय-काय खातात हे उद्धव ठाकरेंनी जाऊन बघावे. ठाकरेंची उठाठेव म्हणजे ‘अाग रामेश्वरी अाणि बंब साेमेश्वरी अाहे.’ मुंबईत अाग लागली असताना ते धुळ्यात येऊन पाणी अाेतत अाहेत. त्यांचा दुताेंडी नाटकीपणा उघड केल्याने त्यांना एवढ्या मिरच्या का झाेंबल्या हे कळत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...