आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्काराच्या माध्यमातून मला निवृत्ती घेण्याचा संदेश तर नाही ना- पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाराष्ट्रात कुठेही फिरताना आता मला काळजी वाटत आहे. मी पंच्याहत्तर वर्षांचा झालो असल्याचे सांगायला माझे सत्कार सोहळे चालले आहेत. मी आता निवृत्ती घ्यावी, असा हा संदेश तर नाही ना? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना उपस्थित केला.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळ व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या कामाविषयी आस्था आहे. अनेक वर्षे समाजकारणात काम करीत असताना देशातील सर्व प्रमुख व्यक्ती एका ठिकाणी आणण्याचा मान महाराष्ट्राला अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्लीत मिळाला. कार्यकर्त्यांनी सामुदायिकपणे काम करून लोकांचा विश्वास संपादन करावा. अधिक जोमाने लोकांच्या अडणीत उभे राहावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते करणार दौरा
पुढील महिन्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तालुकापातळीवर जाऊन त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. त्याबाबत कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुखांशी चर्चा करून दौरा आयोजित करण्यात येईल. यापूर्वी जळगाव जिल्ह्यात चळवळीच्या निमित्ताने गावोगाव फिरलेलाे आहे. त्याची पुन्हा उजळणी करावी, हा हेतू आहे. त्याचबरोबर निष्ठावान कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असल्याच ते म्हणाले.

पवारांना करावी लागली अर्धा तास प्रतीक्षा
देशातील राजकारणात वजनदार नेते असलेले शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्धा तास प्रतीक्षा करायला लावली. जैन हिल्सवरील पुरस्कार वितरण साेहळा १.४५ वाजता हाेता. मुख्यमंत्र्यांना उशीर हाेणार असल्याने पवार यांनी १२.३० वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर बैठक संपवून २.४५ वाजता व्यासपीठावर अाले; परंतु मुख्यमंत्री ३.१५ वाजता व्यासपीठावर अाले. अर्धा तास पवारांनी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा केली. या वेळेत कविवर्य ना. धाें. महानाेर व जैन इरिगेशनचे अध्यक्ष भवरलाल जैन यांनी पवारांशी हितगुज केली.
बातम्या आणखी आहेत...