आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे दाखवा म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना फोटो ट्विट, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असताना राज्यातील रस्त्यावर खड्डे दाखवा अाणि हजार रूपये मिळवा, असे अावाहन करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यांसाेबत घेतलेले सेल्फी ट्विट करण्यात अाले अाहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले पाटील परवाच हवाई दाैऱ्यावर अाले हाेते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवती अाघाडीतर्फे खड्ड्यांचे सेल्फी ट्विट करण्यात अाले अाहे. 
 
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात एकाही रस्त्यावर खड्डा नसल्याचे म्हटले हाेते. यांच्या खड्डा दाखवा अन‌् हजार रूपये मिळवा या अावाहनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यासाेबत सेल्फी घेवून फेसबुक पेजवर व्हायरल करत जाेरदार प्रत्युत्त दिले. त्यानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस युवती अाघाडीतर्फे युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी शहरातील खड्ड्यांसाेबत सेल्फी घेऊन पालकमंत्र्यांना ट्विट केले. तसेच फेसबुकवर देखील सेल्फी शेअर केली.
बातम्या आणखी आहेत...