आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे इच्छुक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत, वरिष्ठांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना राष्ट्रवादीच्या गाेटात मात्र नेतृत्वाबाबत अद्यापही संभ्रम अाहे. िजल्हा मध्यवर्ती बंॅक अाणि िजल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून काेण नेतृत्व करणार? याबाबत पक्षात अद्याप निर्णय झालेला नाही.

जिल्हा मध्यवर्ती बंॅकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली अाहे. या निवडणुकीत भाजप अाणि राष्ट्रवादी या दाेन प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे पॅनल उतरण्याची शक्यता अाहे. राष्ट्रवादीचे िजल्हाध्यक्ष डाॅ.सतीश पाटील अाणि खासदार ईश्वरलाल जैन यांनीदेखील या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचे म्हटले अाहे. गेल्या निवडणुकीत कांॅग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित पॅनल हाेते. मात्र, या वेळी राष्ट्रवादीची भूूमिका स्पष्ट नाही. कारण पक्षाचे पदाधिकारी अाणि इच्छुकांमध्ये या निवडणुकीबाबत सामूहिक चर्चा झालेली नाही. त्यामुळे तालुकापातळीवर इच्छुक असलेले पदाधिकारी वैयक्तिकरीत्या तयारीला लागले अाहेत. पक्ष, पदाधिकारी अाणि वरिष्ठांची भूमिका स्पष्ट नसल्याने गाेंधळ वाढला अाहे.
स्थानिक नेत्यांकडून सर्वपक्षीय पॅनलचे सूर अाळवले जात असल्याने तालुकापातळीवरील पदाधिकारीदेखील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात अाहेत. राष्ट्रवादीतर्फे एकही नेता नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.
जिल्हाध्यक्षांवर भिस्त-
गेल्यावर्षापर्यंत िजल्ह्यात सर्वात माेठा पक्षाची ख्याती मिळवलेल्या राष्ट्रवादीचे लाेकसभा अाणि विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. भाजप-शिवसेनेच्या लाटेतही निवडून अालेले डाॅ.सतीश पाटील हे राष्ट्रवादीचे एकमेव अामदार असल्याने त्यांच्याकडे िजल्ह्याच्या सेनापतिपदाची जबाबदारी देण्यात अाली. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणामुळे िजल्ह्यात येण्यास मज्जाव करण्यात अाला असून, खासदार ईश्वरलाल जैन हे पक्षापासून काहीसे अलिप्त असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे िजल्हाध्यक्ष डाॅ.पाटील हे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.
दूध संघाबाबत उत्सुकता
जिल्हादूध संघावरील प्रशासन मंडळ हटवून तेथे निवडणूक घेण्यासाठी गुलाबराव देवकर सर्वाधिक उत्सुक हाेते. त्यादृष्टीने त्यांनी पालकमंत्री असताना प्रयत्नदेखील केले हाेते. मात्र, न्यायालयाच्या अादेशानुसार ते िजल्ह्यात येऊ शकत नसल्याने दूध संघाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता अाहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत दूध संघात काेण नेतृत्व करणार? याबाबतही प्रश्नचिन्ह कायम अाहे.