आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाराेळ्याजवळ अपघात; दाेन ठार, दाेघे गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा - पाराेळ्याजवळ असणाऱ्या म्हसवे गावाजवळील वळणावर अज्ञात ट्रॉलाने दुचाकीला समाेरून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह एक जण जागीच ठार झाला, तर अन्य दाेन जण गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी घडली.
पाराेळा तालुक्यातील बाेदर्डे येथील साेनल रावण सैंदाणे (वय २८), न्हावी गल्लीतील विशाल गाेपाल चाैधरी (२२) कृष्णा नारायण शिंपी (२५) अाणि भूषण हिरालाल कुंभार (२२) हे चाैघे मित्र साेमवारी पाराेळ्याहून एरंडाेलकडे दुचाकीने जाण्यास निघाले. एरंडाेल पाेहचण्यापूर्वी त्यांनी महामार्गालगत असलेल्या एका विहिरीवर पाेहण्याचा अानंद लुटला. त्यानंतर ते साेनल सैंदाणे याची दुचाकी सीबीझेड (एमएच- १९, अेसी- २१६१) ने पुन्हा एरंडाेलकडे मार्गक्रमण करू लागले. म्हसवे गावाजवळील हाॅटेल सहयाेगच्या वळणावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला समाेरून येणाऱ्या अज्ञात ट्रॉलाने धडक दिली. यावेळीट्रॉलाच्या हूकमध्ये दुचाकी अडकल्याने ती दूरपर्यंत घसरत गेली. या अपघातात साेनल सैंदाणे विशाल चाैधरी या दाेघांचा जागीच मृत्यू झाला. तर भूषण कुंभार कृष्णा शिंपी हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ट्रॉलाचालक वाहनासह पसार झाला.
पाराेळ्यात प्रथमाेपचार : घटनेचीमाहिती मिळताच ईश्वर ठाकूर याने रुग्णवाहिकेने दाेघा जखमींना पाराेळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डाॅ. सुनील पाराेचे यांनी प्रथमाेपचार करून जखमींना धुळे सामान्य रुग्णालयात रवाना केले.
बातम्या आणखी आहेत...