आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Need 40 Lakh For Face Drought Condition In Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टंचाई निवारण : जिल्हा परिषदेला हवे 40 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पावसाळा लांबल्याने टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेला 40 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिका-यांमार्फत शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यंदा जून महिना कोरडा गेल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने जिल्हा प्रशासन चिंतित आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील ग्रामस्थांना टंचाईच्या झळा फारशा जाणवल्या नाहीत. तसेच काही अपवाद वगळता कुठेही टॅँकरने पाणीपुरवठादेखील करावा लागलेला नाही. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेचा टंचाई आराखडा निम्म्यावर आला आहे. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने भविष्यातील टंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने 40 कोटी 86 हजारांच्या निधीची मागणी केली आहे. त्यातून टॅँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण व खोलीकरण, इंधन विहिरी, कूपनलिका आदी कामांचे नियोजन केले जाणार आहे. याशिवाय जुलै महिन्यातही पाऊस न आल्यास टंचाईच्या छायेत येणाºया गावांचे सर्वेक्षण करून तेथे काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याचाही आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

पाच गावांनाच टॅँकरने पाणी
जिल्ह्यातील उमाळा, कंडारी (ता.भुसावळ), देव्हारी, आसोदा व चिंचखेडा बुद्रूक या पाच गावांनाच यंदा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पावसाची स्थिती अशीच राहिल्यास टॅँकरची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.