आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To Full Fill Vacancy In District Bank In Parola

जिल्हा बँक शाखांत अपुरे मनुष्यबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - तालुक्यातील अनेक ठिकाणी जळगाव जिल्हा बॅँकेच्या शाखा आहेत; परंतु तेथील रिक्त जागांमुळे सद्य:स्थितीत कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. याबाबत वेळीच दखल घेऊन स्पर्धेत टिकण्याचे आव्हान संस्थेच्या या शाखांपुढे उभे राहिले आहे.

पारोळा शहरात महाराष्ट्र, आयसीआयसीआय, देना, धरणगाव अर्बन व जळगाव जनता सहकारी बॅँका असल्याने नागरिकांना एटीएम, ऑनलाइन प्रक्रिया, गोल्ड लोन, होम लोन यासह अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या जुन्या इतिहासाची साक्ष जिवंत ठेवण्यासाठी शाखेचे आधुनिकीकरण करणे, कर्मचारी भरती, कोअर बॅँकिंग, एटीएम आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पारोळा तालुक्यात 112 खेडी असून, जिल्हा बॅँकेच्या 13 प्रमुख शाखा आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास 50 टक्के व्यवहार जिल्हा बॅँकेच्या या शाखांमध्ये होत असतात. दीड हजारच्या जवळपास पेन्शनर्स, 900 ते 1000 प्राथमिक शिक्षकांची खाती, 6 हजार वीज ग्राहकांचा बिलांचा भरणा यासह 40 ते 45 हायस्कूल्स, ज्युनियर कॉलेजेस, पंचायत समिती व तहसील कार्यालयातील शासकीय अनुदानांचे व्यवहार याच जिल्हा बॅँकाच्या शाखांद्वारे होत असतात.
दरम्यान, वीज बिल भरणा करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वेळ लागतो. कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने अनेक वेळा नागरिकांना तासनतास रांगेत तातकळत उभे रहावे लागते. कर्मचाºयांची भरती केल्यास नेहमीच होणारी गर्दी कमी होऊन कामाला गती येईल, यात शंका नाही.

कर्मचारी अपूर्ण
तालुक्यातील 13 शाखांपैकी पारोळा शाखेत कॅशिअर व शिरसमणी, रत्नापिंप्री, उंदीरखेडे, बोळे, भिलाली या ठिकाणी लिपिकांची आवश्यकता आहे. तसेच बहादरपूर येथे कॅशिअर व मंगरूळ शाखेला शिपायाची आवश्यकता आहे. यासह पारोळा, तामसवाडी, शेळावे, सारवे, देवगाव शाखेतही अपूर्ण मनुष्यबळामुळे कर्जवाटपासह इतर सेवा देण्यात अडचणी येत आहेत.

न्याय देण्याचा प्रयत्न
- कामाचा खूप ताण असूनही खातेदारांना योग्य न्याय देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.
आर.एन.लोहार, विभागीय उपव्यवस्थापक

रिक्त जागा भराव्यात
- पारोळा शाखेत व्यवहारांचे प्रमाण मोठे असून, वीजबिल भरणाही अधिक आहे. त्यामुळे एका कॅशिअरची रिक्त जागा भरल्यास ग्राहकांचा वेळ वाचून त्यांना इतर सुविधा मिळतील.
दिलीप पाटील, व्यवस्थापक

सुविधांचा अभाव
तालुक्यातील बहुतांश शाखांमध्ये सुविधांचा अभाव असून, या शाखा ऑनलाइन करणे, कोअर बॅँकिग प्रक्रिया, अपूर्ण स्टेशनरी, शुद्ध पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, स्वच्छता आदी कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच या शाखांना जागा अपूर्ण पडत असून, एटीएम सुविधा पुरवली गेल्यास कर्मचाºयांचा ताण कमी होण्यास मदत मिळू शकते.

कामाचा प्रचंड ताण
तालुक्यातील एकूण व्यवहारापैकी 50 टक्के व्यवहार जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होत असतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील या कार्यालयांचे शासकीय व्यवहार, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, शेतकºयांची कर्ज खाती, घरकुल, बचतगट, अंगणवाडी, एलआयसी व इतर शासकीय योजनांचे धनादेशांचे मोठ्या प्रमाणातील व्यवहारामुळे कर्मचाºयांवर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे निवृत्त झालेल्या कर्मचाºयांची बॅँकेच्या मुख्य शाखेला मदत घ्यावी लागते. कामाचा व्याप वाटून घेण्यासाठी सहा ते सात वित्तीय क्षेत्र अधिकाºयांची भरती करणे गरजेचे झाले आहे.

चेअरमन यांनी लक्ष द्यावे!
जळगाव जिल्हा बॅँकेच्या इतिहासात एकाच तालुक्यातील तीन संचालकांना चेअरमनपदाचा मान मिळवून देण्यात पारोळा आघाडीवर आहे. जिल्हा बॅँकेचे विद्यमान चेअरमन आमदार चिमणराव पाटील यांच्यासह माजी खासदार वसंतराव मोरे व माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनीही जिल्हा बॅँकेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या शाखांना चांगल्या सेवा-सुविधा पुरवण्याबाबत, ऑनलाइन प्रक्रिया, एटीएम सुरू करण्याबाबत तत्परता करायला हवी, असा आग्रह खातेदारांकडून होत आहे.