आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांची सुरक्षा वाऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्गदर्शन करताना डीवायएसपी रोहिदास पवार साेबत पाेलिस निरीक्षक नजनपाटील.
भुसावळ- बँकांमधील सुरक्षेचा अाढावा घेण्यासाठी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात डीवायएसपी राेहिदास पवार यांनी शुक्रवारी बँक व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यात बँकांचे अंतर्गत सुरक्षेकडेच दुर्लक्ष हाेत असल्याचे िचत्र स्पष्ट झाले अाहे. या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययाेजना करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या अाहेत.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त डीवायएसपी पवार, निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात अाले. त्यानंतर शहरातील बँकांचा अाढावा घेण्यात अाला. सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, धाेक्याची सूचना देणारा अलार्म अाहे की नाही? याची माहिती बँक व्यवस्थापकांकडून भरून घेण्यात अाली. त्यात तब्बल अाठ बँकांमध्ये सुरक्षारक्षकच नसल्याची माहिती उपलब्ध झाली अाहे.

राजकीयहस्तक्षेप खपवून घेऊ नका
राष्ट्रीयकृतसहकारी बँकांमध्ये कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप हाेत असेल, तर ताे खपवून घेऊ नका. दादागिरीची भाषा जर काेणी वापरत असेल, तर थेट पाेलिसात तक्रार द्यावी, जेणेकरून गुन्हा दाखल करणे साेपे हाेईल. अाॅनलाइन बँकिंगचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अापला एटीएम पीन काेड, खाते क्रमांक काेणालाच देऊ नका, असे अावाहनही या बैठकीत पाेलिसांकडून करण्यात अाले. सुरक्षेसंदर्भात महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. गाेपनीय शाखेचे छाेटू वैद्य, बाळू पाटील, वाल्मीक साेनवणे यांनी ही बैठक यशस्वितेसाठी सहकार्य केले.
बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना
बँक, एटीएम मशीनजवळ सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. मात्र, शक्यताेवर ताे शस्त्रधारी असावा. त्याचे नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक, सुरक्षा एजन्सी असेल तर तिचे नाव, दूरध्वनी क्रमांक पाेलिस ठाण्याकडे द्यावा.
बँकेच्या शाखेत तसेच एटीएम मशीनजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसतील, तर ते तत्काळ लावावे. कॅमेरा नादुरुस्त असेल तर दुरुस्त करून तो सुरू अाहे की नाही? याची वेळाेवेळी पडताळणी करण्यावर भर द्यावा.

बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम मशीनजवळ सूचना देणारा सुरक्षा अलार्म तत्काळ लावावा. लावला असेल तर ताे सुस्थितीत अाहे की नाही? याची खात्री करून घ्या. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा.

बँक परिसरात अनाेळखी व्यक्ती जर वारंवार घिरट्या घालत असेल, अाणि त्याच्या हालचाली संशयास्पद असतील तर पाेलिस ठाण्याला माहिती द्यावी. बँक इमारतीच्या जीर्ण भिंती, कंपाउंड दुरुस्ती करावी.
२६ बँकांचे अधिकारी हजर
स्टेट बँक मुख्य शाखा, अानंदनगर शाखा, इंडियन अाेव्हरसिस बँक, सिंडिकेट बँक, अॅक्सिस बँक, जळगाव पीपल्स बँक, काॅसमाॅस बँक, अकाेला अर्बन बँक, बुलडाणा मर्चंट, अायसीअायसीअाय बँक, महाराष्ट्र बँक यांच्यासह एकूण २६ बँकांचे अधिकारी प्रतिनिधी या बैठकीला हजर हाेते.
काेण काय म्हणाले?
बाजारपेठपाेलिसांनी अाता दिवसाही ‘मार्शल बीट’ गस्त सुरू केली अाहे. दाेन कर्मचारी दिवसभर बँका, बाजारपेठ, िवस्तारित वसाहतीत फिरत अाहेत. अप्रिय घटना घडू नये, म्हणून आवश्यक दक्षता घेण्यात येत अाहे. किसनरावनजनपाटील, पाेलिस निरीक्षक
स्टेटबँकच्या शाखेत प्रत्येक महिन्याला २८ ते १० तारखेपर्यंत ग्राहकांची गर्दी असते. साध्या वेशातील दाेन पाेलिसांची गस्त या कालावधीत राहिली तर भामट्यांच्या मुसक्या अावळता येणे शक्य हाेऊ शकेल. प्रतापसिंगगिरासे, व्यवस्थापक, एसबीअाय
बँकखातेदाराकडून कुठलीच माहिती मागवत नाही. मात्र, माेबाइलवर पाठवण्यात येणाऱ्या मेसेजेसपासून सावधगिरी बाळगावी. एखाद्यावेळी संभ्रम निर्माण हाेत असेल, तर नागरीकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संवाद साधणे याेग्य ठरेल. ईश्वरकुंभारे, व्यवस्थापक, बँक अाॅफ बडाेदा
अाॅनलाइन व्यवहार करताना काळजी घेण्याचा पाेलिसांनी दिला सल्ला
शहरातील भुसावळ पीपल्स बँकेच्या स्टेशन राेड बालाजी गल्ली शाखेत तसेच जेडीसीसी बँकेच्या ब्राह्मण संघाजवळील शाखेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बाजारपेठच्या हद्दीत १४ शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अशी एकूण १८ एटीएम केंद्र अाहेत. परंतु तेथील सुरक्षा तकलादू अाहे. अाठ बँकांमध्ये तर सुरक्षारक्षकच नाहीत. डीवायएसपींनी शुक्रवारी येथे घेतलेल्या बैठकीत हे वास्तव समाेर अाले. त्यामुळे सुरक्षेबाबत बँकांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनाही करण्यात अाल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...