आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nehru Chowk Friends Group Awareness On Social Messege

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे सामाजिक विषयांवर जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या २९ वर्षांपासून शहरात विविध धार्मिक, सामाजिक विषयांवर देखावे तयार करून जनजागृती करणाऱ्या नेहरू चौक मित्र मंडळाने यंदा श्रीराम मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. त्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संकल्पनेची जनजागृती करण्यासाठी पोस्टरदेखील लावली आहेत.
साडेसात फूट उंचीची श्रीरामांची मूर्ती त्यांनी साकारली आहे. आतला देखावा राजवाड्याप्रमाणे सजवला आहे. तर ८० टक्के शाडू माती वापरून फूट उंच गणपतीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
अमरावती येथील जिराफे बंधू यांनी ही मूर्ती तयार केली आहे. येथील राजेश टेंट हाऊस बंगाली कारागिरांनी पीयूष गांधी यांच्या मार्गदर्शनात ही सजावट केली आहे. देखाव्यासाठी ४५ फूट उंच मंडप उभारण्यात आला आहे. बालगोपालांच्या मनोरंजनासाठी बाहेरच्या बाजूला आकर्षक रोषणाई कारंजा सजवण्यात आला आहे. मंडळातर्फे शनिवार गुरुवारी भजन संध्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी अंध मूकबधिर मुलांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे.

मंडळातर्फे आतापर्यंत महालक्ष्मी मंदिर, तिरुपती बालाजी, शिर्डी, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, बर्फाचे अष्टविनायक, रांजणगाव, लालबाग राजा, दगडूशेठ हलवाई, कनिफनाथ, स्वामिनारायण मंदिर, कृष्णलीला आदी देखावे साकारण्यात आले आहेत. २९ वर्षांत विविध ८३ प्रकारचे पुरस्कार मंडळाला प्राप्त झाले आहेत.

गणेशोत्सवाशिवाय रक्तदान, दहीहंडी, स्वच्छता अभियान, रंगपंचमी उत्सवही साजरे करण्यात येतात. संस्थापक अध्यक्ष अजय गांधी उपाध्यक्ष सागर वाणी यांच्या मार्गदर्शनात सुमारे हजार युवक या मंडळाचे सदस्य आहेत. यंदाच्या वर्षी मंडळातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.

विसर्जनातधमाल असणार
मंडळाचीविसर्जन मिरवणूक अत्यंत आकर्षक राहणार आहे. त्यासाठी एकूण पाच ढोल पथक सज्ज झाली आहेत. पंजाब येथून विशेेष ढोल पथकही बोलावण्यात आले आहे. तर शहरातील महिलांचे एक ढोल पथक राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारचा गणवेश राहणार आहे.

सुभाष चाैक मित्र मंडळाने केलेली अारास.
नेहरू मित्र मंडळाने स्थापन केलेली मूर्ती.
शहरातील जुन्या मंडळांपैकी एक सुभाष चौक मित्र मंडळ आहे. मानाचा मानला जाणारा हा गणपती आहे. मंडळाचे यंदा ४२ वे वर्षे आहे. सिंहासनावर विराजमान फूट उंचीची विलोभनीय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मूर्तीवर २० किलो वजनाचे चांदीचे दागिने चढवण्यात आले आहेत. तर ५१ फूट उंचीच्या शुभ्र मंदिराचा देखावा तयार करण्यात आला आहे. जळगाव औरंगाबाद येथील कारागिरांनी हा देखावा उभारला आहे. मंदिरावर केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे वेगवेगळे सात रंग मंदिराला प्राप्त होतात. रविवारी सकाळी ८.३० वाजता गणपती अथर्वशीर्ष कार्यक्रम होणार आहे. या वेळी सुमारे हजार भाविक हजर राहणार आहेत. श्रीकांत खटोड हे मंदिराचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष मनीष अग्रवाल, खजिनदार अलोक अग्रवाल, हरीश चव्हाण, प्रवीण बांगर, अनंत कासार, मयूर कासार आदित्य खटोड आदी सहकार्य करीत आहेत.