आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामाचा खून करणाऱ्या भाच्याला 10 वर्षे कैद, आईनेच दिली मुलाच्या विरोधात साक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- चोपडा तालुक्यातील वडती या गावी दि. २० ऑगस्ट २०१५ रोजी आरोपी रोहिदास युवराज भिल हा वीटभट्टी थापणारे त्याचे मामा शांताराम भगवान भिल यांच्या कडे फिर्यादी राजेंद्र शालिग्राम जगताप आला असता रोहिदास भिल व त्याची आई देखील घर बाहेरील अंगणात बसले असता आरोपी रोहिदास भिल आपल्या आईला दारू पिऊन मारहाण करीत होता.
 
हा सर्व प्रकार बघून बहिणीला सोडविण्यासाठी शांताराम भिल व राजेंद्र जगताप मध्ये आले असता मामाच्या डोक्यात रोहिदास भिलने लाकडी झीलपीने त्यास जागीच बेशुद्ध करत राजेंद्र जगताप यासही मारहाण करत फिर्यादीच्या आणलेल्या मोटारसायकलीची दगडी पाटा टाकून तोड फोड केली व घटना स्थळावरून पळ काढला.
 
यानंतर शांताराम भिल यास रुग्णालयात घेऊन गेले असता त्याचा मृत्यू झाला त्या मृत्यूस आरोपी रोहिदास भिल कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर दि २१ रोजी अडावद पोलीस स्थानकात राजेंद्र जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व  खटल्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी योग्यरित्या तपास करत आरोपीस अटक करण्यात आली. हा सर्व खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डी. ई. कोठलीकर यांच्या न्यायालयात चालले असता या कमी एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.
 
या पैकी आरोपीची मामी व आई यांची महत्वपूर्ण साक्ष ठरल्याने मामाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आरोपीस या गुन्ह्यातील दोषी ठरवत भा.द.वि. कलम ३०४ मध्ये १० वर्ष सक्त मजुरी ५ हजार रु दंड, दंड न भरल्यास १ महिना कैद तसेच फिर्यादीस जखमी झाल्यामुळे  भा.द.वि. कलम ३२४ प्रमाणे १ वर्ष शिक्षा २ हजार रु दंड, फिर्यादीच्या गाडी तोडफोड केल्या प्रकरणी कलम ४२७ प्रमाणे १ वर्ष शिक्षा ३ हजार रु दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास २१ दिवस कैद होईल. सर्व आरोपी अटक झाली तेव्हापासूनच जळगाव येथील कारागृहात आहेत. 
बातम्या आणखी आहेत...