आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेरीच्या तरुणाचा 'चित्रफीत ३.० मेगापिक्सल' हा चित्रपट होणार प्रदर्शित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेरी - खान्देशातील अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावले आहे. त्यात आणखी एकाची भर पडली, ती दिवाकर घोडके या नेरीच्या तरुणाची. त्यांनी यांनी भरकटलेल्या तरुणाईवर भाष्य करणारी चित्रफीत ३.० मेगापिक्सल हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पटकथा, संवादलेखन, संकलन अशा भूमिकेतून त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी तो प्रदर्शित होणार आहे.
समाजातील वास्तववादी चित्र पडद्यावर रेखाटण्यासाठी अग्रस्थानी असलेल्या मराठी चित्रपटांना बोल्ड विषय हाताळताना विशेष सावधानता बाळगावी लागते. परंतु, आजच्या तरुणाईवर भाष्य करणारा चित्रफीत ३.० मेगापिक्सल या चित्रपटाने मात्र जळजळीत वास्तव मांडले आहे. चित्रपटाच्या व्याख्येला छेदून अब्दुल आर. सी. आणि राहुल बोरसे यांच्या जाफ्रान फिल्मने चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट बनवला आहे.

अचूक विषय : आजचीतरुणाई भरकटलेली आहे. चंगळवादाचा फटका कसा बसत आहे. यावर चित्रपटात भाष्य केलेले आहे.

चित्रपटाची कथा
मैत्रीच्यानात्याखाली केली जाणारी फसवणूक, प्रेमाच्या गुलाबी पडद्याच्या आड केले जाणारे शारीरिक शोषण आणि भावनेच्या आहारी जाऊन केली जाणारी अगतिकता यांच्या जाळ्यात आजची तरुणाई अडकल्याचे चित्र दाखवले आहे. हा चित्रपट अतिशय संवेदनशील असून ब-याच ठिकाणी बोल्ड दृश्यांचा वापर केला आहे. फाइन आर्टचा विद्यार्थी असलेला सिनेमाचा नायक आणि संशोधनादरम्यान एकत्र आलेली नायिका आपापल्या क्षेत्रात १०० टक्के योगदान देतात. दोघांमध्ये जेव्हा शारीरिक आकर्षण होते, तेव्हा मुलीच्या आयुष्याशी नवा खेळ सुरू होतो.

पुढे वाचा