आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट परीक्षेसाठी पेन, घड्याळास बंदी : कॉपी, पेपरफुटीमुळे सीबीएसईचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
जळगाव- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नॅशनल इलिबिजिलिटी टेस्ट (नेट) परीक्षेच्या वेळी आता मनपसंत पेन किंवा घड्याळ वापरण्यावर सीबीएसईने बंदी घातली आहे. अत्याधुनिक प्रकारे होणाऱ्या कॉपी केस, पेपरफुटीमुळे सीबीएसईने हे पाऊल उचलले आहे.
घड्याळ पेन नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून परीक्षागृहातच बॉलपेन दिला जाईल. तसेच प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसेल, अशी घड्याळ असणार आहे. त्यामुळे घरून पेन किंवा घड्याळ आणण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.
जून महिन्यात झालेल्या नेट परीक्षेपेक्षाही यंदा जाचक नियम लावण्यात आले आहेत. तसेच पेपर सुरू व्हायच्या अडीच तास आधी केंद्रावर पोहचण्याची अट घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना तपासणीसाठी किमान अडीच तास आधी परीक्षा केंद्रावर हजर रहावे लागणार आहे. प्रवेशपत्रासह पॅनकार्ड, मतदानकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना किंवा अाधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट प्रमाणेच आता नेट परीक्षेचे नियम असणार आहेत. गेल्या काही वर्षांत प्रश्नपत्रिका फुटणे, अत्याधुनिक पद्धतीने कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आले होते. यास पायबंद घालण्यासाठी आता जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. तसेच दोन पेपरमधील अंतर कमी करून आता केवळ अर्धा तास गॅप ठेवण्यात येणार आहे.

चार शहरांचा पर्याय
यापूर्वीसीबीएसई नेट परीक्षेसाठी एका शहराचा पर्याय देत होते. आता चार शहरांची निवड करावी लागणार आहे. यापैकी काेणत्याही एका शहरात परीक्षा होईल. जर विद्यार्थ्यांची परीक्षा लांबच्या शहरात झाली तर प्रवासासह इतर खर्च वाढणार आहे. शिवाय जाचक अटींची पुर्तता करण्यासाठी अडीच तास आधी केंद्रावर पोहचणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना त्रास
सीबीएसईच्याया जाचक अटींमुळे एकीकडे परीक्षा चोख पद्धतीने होईल. पण याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. अडीच तास आधी केंद्रावर पोहाेचणे, तपासणीच्या मोठ्या चक्रव्यूहमधून परीक्षागृहात पोहचणे ही सर्व प्रक्रिया त्रासदायक ठरू शकते. तरीही प्रक्रिया महत्त्वाची आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...