आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळधीजवळ ट्रॅक्टर कलंडला; चालक ठार, सांगवीजवळ ट्रकच्या धडकेत 5 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळधी-नेरी रस्त्यावर ट्राॅलीसह कलंडलेला ट्रॅक्टर. - Divya Marathi
पाळधी-नेरी रस्त्यावर ट्राॅलीसह कलंडलेला ट्रॅक्टर.
जामनेर - पाळधीते नेरीदरम्यान ट्रॅक्टर कलंडून रोटवद येथील चालकाचा मृत्यू झाला. यात चालक संतोष डिगंबर चौधरी याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. 
 
सुप्रीम कंपनीने सामाजिक बांधीलकीतून पहूर जवळील हिवरी हिवरखेडा या गावाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी कंपनीतील ठेकेदाराच्या ट्रॅक्टरमधून हिवरी हिवरखेडा येथे पाइप पोहोचवले जात होते. ८५ पाइप घेऊन जात असलेले ट्रॅक्टर पाळधीजवळील वळणावर ट्राॅलीसह कलंडले. त्यात दाबला जाऊन चालक संतोष डिगंबर चौधरी (वय ३६) याचा जागीच मृत्यू झाला. तर राकेश धोबी (रा. नाचणखेडा) याच्यासह अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर कलंडून भररस्त्यात पाइप अस्ताव्यस्त पडल्याने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एक ते दीड तास ठप्प झाली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सांगवीजवळ ट्रकच्या धडकेत 5 जण जखमी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...