आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची छेडछाड रोखण्यासाठी नवे मोबाइल अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हापोलिस दलातर्फे सायबर गुन्हेगारीला अाळा घालण्यासाठी, महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी नवे मोबाइल अँड्राॅइड अॅप तयार केले आहेत. महिला अत्याचाराच्या घटना आणि ज्येष्ठ नागरिकांना या अॅपची मदत हाेणार अाहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल, एन.व्ही.टेक्नॉलॉजी आणि सिद्धी सॉफ्टवेअर सोल्युशन यांच्या मदतीने नवीन सोशल मीडिया सेंटर तयार करण्यात आले आहे.

महिलांसाठी उपयोगी अॅप
सिद्धी सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग महिलांना, तरुणी यांना छेडखानी राेखण्यासाठी तसेच एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. मोबाइल अॅपवर बोट ठेवताच ते कार्यान्वित होऊन त्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षात सेकंदाला पोहोचणार अाहे. त्यामुळे पीडितांना तत्काळ मदत पोहोचवली जाणार आहे. अँड्रॉइड मोबाइलमधील जीपीएस प्रणाली सुरू असल्यास या अॅपमध्ये देण्यात आलेल्या निर्भया या पर्यायाची निवड केल्यास आपण असलेल्या ठिकाणाची पोलिसांना माहिती होणार आहे. या अॅपमध्ये सर्व पोलिस ठाण्यांचे क्रमांकासह विविध पर्याय देण्यात आले आहेत.

मंगळवारी प्रजासत्ताकदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते या सोशल मीडिया सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी खासदार ए.टी.पाटील, अामदार गुरुमुख जगवानी, जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अादी उपस्थित हाेते.

...असे करेल अॅप काम
अँड्राॅइड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन जळगाव पोलिस हेल्पलाइन हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल. त्यात आपले नाव नंबर, पत्ता, उपयोगी माहितीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींचे संपर्क नंबर आदी माहिती अपलोड करून घ्यावी लागेल. त्यासाठी जीपीएस प्रणाली सुरू असणे अावश्यक अाहे. पोलिस मदतीची आवश्यकता असल्यावर मोबाइलमध्ये या अॅपवर बोट ठेवताच नियंत्रण कक्षास त्यांचे लाेकेशन प्राप्त हाेऊन तत्काळ पाेलिसांची मदत हाेईल.

सर्व माहिती ऑनलाइन
जिल्हापोलिस दलाची वेबसाइटही या सेंटरच्या माध्यमातून हाताळण्यात येणार आहे. एन.व्ही.टेक्नॉलॉजीने पोलिस प्रशासनाचे िट‌्वटर अकाउंट, फेसबुक पेज सुरू करण्यात आले अाहे. त्याद्वारे पोलिस दलाची सर्व माहिती त्यावर दिली जाणार आहे. सिद्धी सॉफ्टवेअरसोबत पोलिस दलातील संगणकतज्ज्ञ अाणि सायबर सेलचा अनुभव असलेल्या चंद्रकांत पाटील, विजय पाटील, प्रदीप पाटील, दिनेश बडगुजर, जयंत चौधरी आणि श्रीकृष्ण पटवर्धन या कर्मचाऱ्यांनी अॅपच्या निर्मितीत अपेक्षित सुधारणांसह उपयोगी माहितीचे संकलन उपलब्ध केले आहे.