आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा सामान्य रुग्णालयात बांधण्यात अालेले नवीन शवविच्छेदनगृह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अनेकवर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शवविच्छेदनगृहाचे बांधकाम अखेर पूर्णत्वास अाले अाहे. दाेन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे अाश्वासन देणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांत नूतनीकरण पूर्ण केले अाहे. त्यामुळे १५ दिवसांत या पीएम रुममध्ये अद्ययावत शवपेट्या बसवल्या जाणार अाहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली मृतदेहांची हेळसांड लवकरच थांबणार अाहे. यासाठी 'दिव्य मराठी’ने वेळाेवेळी वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फाेडली हाेती.
इम्पॅक्ट
शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास अाले अाहे. बांधकाम पूर्ण झाले असून इलेक्ट्रि फिटिंग, शवपेट्या बसविण्याचे अािण काही किरकाेळ कामे राहिली अाहेत. येत्या १५दिवसांत नवीन पीएम रुम सुरू करण्याचा मानस अाहे.
कशासाठी झाला किती खर्च
शवविच्छेदनगृहाच्यानूतनीकरणासाठी िजल्हा रुग्णालयाने बांधकाम िवभागाला २० जून २०१४ ला २९ लाखांचा िनधी िदला. त्यात बांधकामासाठी १६ लाख रुपये खर्च करण्यात अाले. तर उर्वरित १३ लाखांचा निधी एसी तसेच इतर इलेक्ट्रिकल्स कामासाठी वापरले जाणार अाहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बांधकामाचे काम िवलास पाटील या ठेकेदाराला िदलेले अाहे.
पाच महिने २९ लाख ‘पीडब्ल्यूडी’कडे पडून
जिल्हारुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणासाठी अालेला २९ लाखांचा निधी २० जूनला सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द केला. त्यानंतर पाच महिन्यांनंतर म्हणजे १५ अाॅक्टाेबरला नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे जवळपास शवविच्छेदनगृहाच्या नूतनीकरणाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाच महिने पडून हाेता. शवविच्छेदनगृहाचा प्रश्ना ' दिव्य मराठी’ने लावून धरल्यानंतर अाॅक्टाेबर महिन्यात बांधकामाला सुरुवात केली.
असे अाहे नवीन‘पीएम रुम’चे रुप
नवीनपीएम रुममध्ये चार खाेल्या अाहेत. डाॅक्टरांना बसण्यासाठी चेंबर, मृताच्या नातेवाइकांना बसण्यासाठी एक खाेली, शवविच्छेदनासाठी एक अािण अनाेखळी मृतदेह ठेवण्यासाठी असलेल्या तीन शवपेट्यांसाठी एक, अशा चार माेठ्या खाेल्या तयार केल्या अाहेत. तसेच उन्हाळा अािण पावसाळ्यात शवविच्छेदनगृहाच्या बाहेर नातेवाइकांना बसण्यासाठी पत्र्याचे माेठे शेड उभारण्यात अाले अाहे. अाता फक्त खाेल्यांमधील लाइट, एसी अािण सीसीटीव्ही लावण्याचे काम श्‍ािल्लक राहिले अाहेे.