आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्भकाच्या मृत्यूमागे नरबळीची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर काल बुधवारी सायंकाळी अर्भकाचे मुंडके आढळून आले. त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी या घटनेमागे घातपात असल्याची शक्यता वर्तविली आहे. सदरचा प्रकार नरबळी आहे किंवा कसे याबाबत पोलिसांना संशय आहे. याबाबत धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी निवासस्थानापासून पांझरा नदीच्या दिशेने गेल्यावर कालिकादेवीचे मंदिर आहे. या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात अर्भकाचे मुंडके पडले असल्याची माहिती एका नागरिकाने काल बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास फोनवरून धुळे शहर पोलिसांना दिली. काही कुत्रे या मुंडक्यास ओढत असल्याची माहितीही संबंधित नागरिकाने दिली. त्यानंतर ठाणे अंमलदार आशाबाई नाथजोगी यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक कोळी, नरेंद्रसिंग कच्छवा, ओंकार गायकवाड, कोमलसिंग परदेशी आदी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बघ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.

धुळे शहर पोलिसांनी हे मुंडके ताब्यात घेऊन ते वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रविकिरण राठोड यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 318 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल कोमलसिंग परदेशी या घटनेचा तपास करीत आहे. दरम्यान, शरीराच्या या अवशेषावरून मृत अर्भक नवजात नसून ते किमान तीन ते चार वर्षे वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.