आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवविवाहितेने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी विवाहितेच्या माहेरच्यांनी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे.

माहेर नशिराबाद असलेल्या असगरअली यांची कन्या शबिनाबी हिचा विवाह 8 मे 2013 रोजी शिवाजीनगर भागातील मकरा पार्क येथील रहिवासी शेख मोहम्मद वसीम शेख ताहेर याच्याशी झाला होता. लग्नानंतर लागलीच शबिनाने माहेरहून एक लाख रुपये आणावेत, असा तगादा पतीसह तिची सासू शिरीनबी शेख, जेठ रफीक शेख, जेठाणी सोनी व नणंद नसरीनबानो यांनी लावला होता. यासाठी ते तिचा वेळोवेळी छळ करीत असल्याचा आरोप शबिनाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच घटना घडण्याच्या रात्री (शनिवारी) वसीम आणि शबिना यांच्यात भांडण झाल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.

पैशांच्या हव्यासापोटी छळ
शबिनाचा विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी 50 हजार रुपये आणण्यास सांगितले होते. त्यानुसार तिने आणून दिले. त्यानंतर पुन्हा एक लाखाची मागणी केली. यासाठी तिचा छळदेखील करण्यात आला. त्यामुळे पैशांसाठी शबिनाने वडील व भाऊ यांना ईद असल्यामुळे थोडे दिवस थांब, असे शबिनाला सांगितले होते. अशातच तिने आत्महत्या केली.

हत्या केल्याचा आरोप
सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शबिनाचा भाऊ मुश्ताकअली याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात शबिनाचा पती वसीम शेख, जेठ रफीक शेख, जेठाणी सोनी, सासू शिरीनबी व नणंद नसरीनबानो यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेठ रफिकला सोडून सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.


वसीमचे दुसरे लग्न
वसीमचे मागच्याच वर्षी काट्याफाइल भागातील एका तरुणीशी लग्न झाले होते. कौटुंबिक वादामुळे ती माहेरी निघून गेली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोटही झाला. त्यानंतर मे महिन्यात वसीमने शबिनाबीसोबत दुसरा विवाह केला होता.