जळगाव- राज्यातीलएसटी महामंडळ आधीच तोट्यात असल्याने प्रवाशांना सेवा-सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. त्यातच केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एसटी नामशेष होण्याची भीती आहे. केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या रस्ता परिवहन आणि सुरक्षा विधेयकामुळे खासगी वाहतूकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी मिळणार असल्याने राज्यात परमिटराज येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या विधेयकाला एसटी कामगार संघटनेने विरोध केला असून, त्यासाठी कामगार आणि प्रशासनाला सोबत घेऊन लढा उभारला जाणार अाहे. तसेच त्यादृष्टीने संघटनेतर्फे नियोजन करण्यात येत आहे.
यासाठी संघटनेचा विरोध
यानवीन विधेयकातील नव्या कायद्याच्या भाग 7 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार खासगी वाहनधारकांनाही टप्पा वाहतुकीची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी निविदा मागवून मार्गांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीची एकाधिकारशाही संपुष्टात येणार असल्याने महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. परिणामी, खासगी वाहतूकदारांकडून सर्वसामान्य प्रवाशांची पिळवणूक सुरू होईल. तसेच विद्यार्थी, महिला ज्येष्ठ नागरिकांना सुविधाही मिळणार नाहीत. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन एसटी कामगार संघटनेने या विधेयकाला विरोध केला आहे. यासंदर्भात २३ नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींचा मेळावा होणार असून, या मेळाव्यात विधेयकाविरोधातील धोरण निश्चित होणार आहे. तसेच सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना निवेदने देऊन या विधेयकातील प्रवासी वाहतुकीसंदर्भात असलेल्या भाग ७मध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली जाणार आहे.
आंदोलन करणार
केंद्राच्याविधेयकास संघटनेचा विरोध कायम राहणार आहे. तसेच त्याविरोधात जिल्हाभरात प्रचार मोहीम राबवून आंदोलने केली जातील. याबाबत आमदारांना निवेदन देऊन विरोधाची सुरुवात केली असून, सर्व संघटनांना सोबत घेऊन कार्यवाही करणार आहोत. सुरेशचांगरे, जिल्हाध्यक्ष,कामगार संघटना
खासगी वाहतूकदारांना टप्पा परवानगी देण्यास विरोध
जळगाव राज्यातीलखासगी वाहतूकदारांना टप्पा वाहतुकीची परवानगी देण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. मात्र, राज्यातील एसटी महामंडळाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी एसटी मान्यताप्राप्त कामगार संघटनेने या विधेयकास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाविरोधात राज्यभर लवकरच आंदोलन छेडले जाईल, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.