आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन अावक, अायातीमुळे डाळींची बाजारपेठ अस्थिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या सहा महिन्यांपासून डाळीच्या बाजारपेठेत निर्माण झालेली अस्थिरता अद्यापही कायम अाहे. शेतकऱ्यांच्या तुरी बाजारात दाखल झाल्या असून दुसरीकडे विदेशातून तूरडाळ अायात केली जात अाहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून तूर अाणि तूरडाळ या दाेघांच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरूच अाहेत.

बाजारपेठेत शेतकऱ्यांचा माल दाखल हाेताच सुरुवातीला महिनाभरापूर्वी १३ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला भाव १० हजार ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली अाला अाहे. गेल्या अाठवड्यात तुरीचे भाव सात हजार रुपयांपर्यंत खाली अाले हाेते. मात्र, बाजार सावरला अाणि भाव पुन्हा १० हजारांपर्यंत वाढले अाहेत. बाजारपेठेतील मागणी, विदेशातून सुरू असलेली अायात याचा परिणाम बाजारभावावर हाेत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे अाहे. बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे व्यापारीदेखील तूर अाणि तूरडाळीची खरेदी, साठा करण्याची जाेखीम पत्करत नसल्याचे चित्र अाहे. जळगाव बाजार समितीमध्ये तुरीची अावक जेमतेम अाहे.

अायात डाळ १२० रुपये किलाे
देशांतर्गतबाजारपेठेत तूरडाळीच्या किमती वाढल्याने केंद्र शासनाने अर्जेंटिना येथून तूरडाळ अायात सुरू केली अाहे. मुंबई अाणि गुजरातमार्गे ही डाळ जळगावच्या बाजारपेठेत दाखल झाली अाहे. काहीशी पांढऱ्या रंगाची असलेली ही डाळ १२० ते १२५ रुपये प्रतिकिलाेप्रमाणे विक्री केली जात अाहे. त्या तुलनेत लाल असलेली गावराणी नवीन तूरडाळ बाजारपेठेत १४५ ते १५० रुपयांपर्यंत विक्री केली जात अाहे. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने यावर्षी बाजारपेठेत अपेक्षित तूर येणार नाही. त्याचा परिणाम म्हणून येत्या हंगामापर्यंत डाळीच्या भावात अाणखी वाढ हाेऊ शकते, हे गृहित धरून बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी केंद्र शासनाने पाच हजार टन तूरडाळ अायात करण्यासाठी टेंडर काढले अाहे. ही डाळ अायात केल्यानंतर डाळीचे भाव कमी-अधिक हाेऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत अाहे.

सध्या बाजारपेठेत नवीन तूरडाळ दाखल झाली आहे. अायात केलेली डाळदेखील उपलब्ध अाहे. मात्र, भावातील चढ-उतार सुरूच असून बाजार अस्थिर अाहे. प्रवीण पगारिया, धान्य व्यापारी