आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमवितर्फे विधी प्रशाळेंतर्गत नव्या अभ्यासक्रमांना प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विधी प्रशाळेंतर्गत या वर्षापासून तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या संकल्पनेतून विद्यापीठात विधी प्रशाळा सुरू झाली असून या वर्षापासून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल ज्युरीस्प्रुडन्स अॅण्ड टॉक्सिकोलॉजी’, ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो फॉरेन्सिक लॉ अॅण्ड बायो टेरेरिझम लॉ’ हे तीन पदव्युत्तर-पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी पात्र आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देऊन द्यावी. त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेबाबत अन् अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरी देखील काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठात संपर्क साधावा, असे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.

कायद्याविषयी सखोल माहिती मिळणार
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपी राइट, ट्रेडमार्क, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, प्रेस कौन्सिल आदी कायद्यांविषयी सखोल माहिती प्राप्त होईल, अशी माहिती प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. एस.आर.भादलीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...