आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल १८ दिवसांनंतर सराफ बाजारात चैतन्य, बंगाली कारागीर गावावरून परतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अबकारी करासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सुवर्णकारांनी पुकारलेला संप शनिवारी मागे घेतल्याने तब्बल १८ दिवसांनी रविवारी सराफ बाजारात पुन्हा चैतन्य पसरले हाेते. रविवारी दाेन ते तीन माेठ्या सुवर्णपेढ्यांसह सुमारे १० लहान-माेठी दुकानेे सुरू हाेती. साेमवारपासून संपूर्ण बाजारपेठ गजबजणार अाहे.

राज्य सुवर्णकार संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये जळगाव शहर सराफ असाेसिएशनने मार्च राेजी सहभाग नाेंदवला हाेता. त्यांनी संपकाळात मठ्ठाविक्री, कपडे काढाे अांदाेलन, मेणबत्ती माेर्चा तसेच बैठकींतून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. काही छाेट्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला सर्व व्यापाऱ्यांनी विराेध केला हाेता.

१०० काेटींचा व्यवसाय बुडाला
शहरात१५० तर जिल्ह्यात ६०० च्यावर सुवर्णपेढ्या अाहेत. १८ दिवसांच्या बंदमुळे सुमारे सराफांचा सुमारे १०० काेटी रुपयांचा व्यवसाय बुडाला अाहे. यावर व्हॅट अायकरच्या माध्यमातून शासनाचा दाेन काेटींचा महसूल बुडाला अाहे.

१५ हजार जणांना पुन्हा काम
दागिनेघडवण्यासाठी बंगाली, राजस्थानी मारवाडी १२ हजारांपेक्षा जास्त कारागीर अाहेत, तर सराफांच्या दुकानांत सुमारे दाेन हजार कर्मचारी अाहेत. बंदमुळे बंगाली राजस्थानी कारागीर अापल्या गावी निघून गेले हाेते, तर शाे रूममधील कामगारांना सुट्टी दिली हाेती. बंद मागे घेतल्याने कारागीर पुन्हा कामावर हजर झाले.

बंद पूर्णपणे मागे
राज्यात काही ठिकाणी बंद-चालू अशी स्थिती असल्याची माहिती मिळत अाहे. मात्र, जळगाव शहर जिल्ह्यात सुवर्णकारांनी पुकारलेला बंद पूर्णपणे मागे घेतला अाहे. स्वरूप लुंकड, सचिव,शहर जिल्हा सराफ असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...