आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी महाविद्यालयात होणार पंचवीस कोटींतून सुविधा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - आगामी वर्षभराच्या काळात येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात 25 कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. यात प्रशिक्षणाला आलेल्या शेतक-यांसाठी कृषी निवास, विद्यार्थ्यांसाठी प्रेक्षकगृह, प्रशासकीय इमारतीसह उपविभागीय कार्यालय, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वसतिगृहे, जिमखाना आदी कामांचा समावेश असणार आहे. याशिवाय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांतील विविध विषयांचा आढावा व महत्त्वपूर्ण आर्थिक मागण्यांना मंजुरी देण्यात आली. या वेळी परिषदेचे सदस्य आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. तानाजी ढसाळ, कुलसचिव सुनील वानखेडे, डॉ. भीमराव उल्मेक, डॉ. प्रकाश तुरभट, यांच्यासह विद्यापीठाच्या विविध समित्यांचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद रसाळ आदी उपस्थित होते. बैठकीपूर्वी कुलगुरू डॉ. मोरे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेऊन समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत परिषदेचे सदस्य आमदार शरद पाटील आणि इतरांकडून करण्यात आलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करण्यात आल्या.

मागणीनुसार बैठक
राहुरी येथे 22 मे 2014 रोजी झालेल्या कार्यकारी परिषदेत सदस्य शरद पाटील यांनी पुढील बैठक धुळे येथे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. दरम्यान, यापूर्वीच्या बैठकांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात विद्यापीठाची संशोधन केंद्रे, विकासकामे, विविध योजना देताना अन्याय केला जात असल्याची तक्रार करण्यात आली. विद्यापीठाकडून पश्चिम महारा ष्ट्र ाला झुकते माप देण्यात येत असल्याने खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी करण्यात आली होती. तसेच विद्यापीठाच्या कारभारात दुजाभावाची तक्रार करण्यात आली होती.
० शहरात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय (बी.टेक) सुरू करणे.
० प्रशिक्षणासाठी येणा-या शेतक-यांसाठी निवास भवन उभारणे.
० प्रशासकीय इमारत उभारून उपविभागीय कार्यालय स्थापन करणे.
० होम सायन्स शाखा सुरू करण्याचा कार्यकारी परिषदेचा निर्णय.